श्रीगोंद्यात देशी दारूचे दुकान फोडले,दीड लाखाचा ऐवज लंपास

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यात चोरीच्या, दरोड्याच्या अनेक घटना घडत असतानाच श्रीगोंदा शहरातील कैकाडी गल्ली येथील काही महिन्यांपासून बंद असलेल्या सरकारमान्य देशी दारूचे दुकान काही अज्ञात चोरांनी फोडले. या दुकानातून सुमारे १ लाख ४८ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
याबाबत माहिती अशी की, श्रावण कुमार रामलु कुरैमुला रा.पंतनगर, श्रीगोंदा यांनी शहरातील कैकाडी गल्ली येथील सुमारे पंचवीस वर्षांपासून सुरू असलेले सरकारमान्य देशी दारूचे दुकान २००६ मध्ये विकत घेतले. परंतु मार्च मार्च २०१७ मध्ये सर्वोच्य न्यायालयाच्या राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील देशी व विदेशी दारूचे दुकाने बंद करण्याच्या निर्णयाने कुमार यांनी सुमारे २ लाख ५० हजार रूपयांचा माल दुकानात ठेवून दुकान बंद करून ३१ मार्च रोजी ते हैदराबाद येथील त्यांच्या मूळगावी गेले.

ते काल दि.१७ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ते या दुकानासमोर गेले असता त्यांना त्यांच्या दुकानाची दहा फूट उंचीची पक्की भिंत पाडलेली दिसली तसेच दुकानाचे कुलूप तोडलेले दिसले. दुकानातील सामानाची चोरी झाल्याचे लक्षात आले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
चोरी गेलेल्या सामानात १२ टेबल,२७ खुच्र्या,५ सिलिंग फॅन,टीव्ही, आडवा फ्रिज, एक इन्व्हर्टर बॅटरी, दुकानाचे पत्रे, लोखंडी अँगल असा एकूण १ लाख ४८ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असून. याबाबत श्रावण कुमार रामलू कुरैमुला यांनी बाबू महादू माने (गायकवाड), बापू बाबा माने (गायकवाड) व सचिन विठ्ठल जाधव या तिघांविरोधात दि.३१/ ३ / २०१७ ते १७ /७ /२०१७ या काळात त्यांच्या मालकीचे सरकारमान्य देशी दारूचे दुकानाचे कुलूप तोडून, भिंत पाडून या तिघा संशयितांनी सदर मुद्देमाल चोरून नेल्याची श्रीगोंदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.या तिघाविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून, पुढील तपास पो उप नि महावीर जाधव हे करीत आहेत.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.