बनावट सह्या करून ८ लाख ३९ हजारांची फसवणूक .

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पाथर्डी तालुक्यातील जांभळी गावात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील रोपवाटिकेच्या कामात पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्याच्या बनावट सह्या करून ८ लाख ३९,४०३ रुपये ग्रामसेवक व ग्रामस्वंयरोजगार यांनी काढले. याप्रकरणी बनावट दस्तऐवज तयार करून शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा शुक्रवारी रात्री पोलिसांत दाखल झाला आहे. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------

काही गावांतील ग्रामसेवक व सरपंच यांनी मंत्रालयात जाऊन राजकीय व्यक्तींची मदत घेऊन याबाबत खुलासा करून व कागदोपत्री काहीच घडले नाही, असे दाखविले. जांभळी गावातील रोपवाटिकेच्या कामात 12 जुलै 2012 ते 28 सप्टेंबर 2012 या कालावधीत मजुरांच्या नावाने ८ लाख ३९,४०३ रुपये काढले गेले. 

मात्र, मोजमाप पुस्तिकेमध्ये मिरी-तिसगाव विभागासाठी असणारे पंचायत समितीचे कृषी अधिकारी मधुकर रामभाऊ घोडके यांच्या बनावट सह्या केल्याचे उघड झाले आहे. शुक्रवारी कृषी अधिकारी घोडके यांनी पोलिसांत तक्रार दाखल कली आहे. 

जांभळी गावाचे तत्कालीन (सध्या निलंबित असणारे) ग्रामसेवक भारत महादेव सोनकांबळे व ग्रामस्वंयरोजगार अंकुश कचरू गोरे रा.जांभळी यांनी ग्रामपंचायतीच्या मोजमाप पुस्तकावर खोट्या सह्या करून शासनाची ८ लाख ३९,४०३ रुपयांची फसवणूक केली. पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण तपास करीत आहेत.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
याबाबत बोलताना जांभळी गावचे तत्कालीन सरपंच विजय आव्हाड म्हणाले , रोपवाटिकेबाबत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राजेंद्र कासार यांनी ग्रामसेवक भारत सोनकांबळे व माझ्याविरुद्ध 2014 मध्ये फिर्याद दाखल केली होती. आम्हाला जामीन मिळालेला आहे. 

अहमदनगर येथे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहे. मग पुन्हा त्याच विषयावर दोन वेळेस गुन्हा कसा नोंदविला जातो. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी खोटया सह्यांबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्याची चौकशी होऊन मोजमाप पुस्तिकेवर मधुकर घोडके यांच्या सह्या असल्याचा चौकशी अहवाल तत्कालीन गटविकास अधिकारी सदावर्ते यांनी दिलेला आहे. याबाबत मी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. ग्रामपंचायतीची सत्ता गेल्या पंधरा वषांर्पासून माझ्याकडे असल्याने विरोधकांनी षडयंत्र रचले असून, राजकीय हस्तक्षेपामुळे हा गुन्हा दाखल केला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.