पगार थकल्याने मनपाचे शिक्षक कर्जबाजारी !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महापालिका शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सुमारे चार महिन्यांपासून पगार थकले आहेत. यामुळे शिक्षक कर्जबाजारी झाले आहेत. या शिक्षकांना चार महिन्यांपासून पगार होईल, या आश्वासनाशिवाय महापालिकेकडून काहीच मिळत नव्हते. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
शेवटी शिक्षकांचा बांध फुटला आणि उपायुक्त विक्रम दराडे यांच्या दालनात सुमारे चार तास ठिय्या आंदोलन केले. विक्रम दराडे यांनी २७ नोव्हेंबरपर्यंत शिक्षकांचे पगार खात्यावर जमा होतील, असे आश्वासन दिले. यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

महापालिकेचे ४५ शिक्षक आणि सात शिक्षकेत्तर कर्मचारी, असे ५२ जणांचे ऑगस्ट महिन्यांपासूनचे पगार थकले आहे. सुमारे ६० लाख रुपयांची ही थकबाकी आहे. या शिक्षकांना पगार होईल, एवढेत आश्वासन मिळत होते. शिक्षकांनी पगारासाठी प्रशाकीय पातळीवर अनेकदा पाठपुरावा केला. पण दाद मिळाली नाही. 

महापालिका युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांच्याकडे शिक्षकांनी आपली कैफियत मांडली. लोखंडे यांनी या शिक्षकांना घेऊन आज महापालिका गाठली. उपायुक्त विक्रम दराडे यांच्यासमोर कैफियत मांडली. दराडे यांना मात्र ठोस आश्वासन देता येईना. अनंत लोखंडे यांनी शेवटी शिक्षकांसह दराडे यांच्या दालनात बसून घेतले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
महापालिकेमुळे हे शिक्षक कर्जबाजारी झाले आहेत. काहींनी खाजगी कर्ज उचलले आहे. त्यावर चक्रवाढ व्याज चालू आहे. पगार नसल्याने काहींचे संसार मोडायला आले आहेत. पोरंबाळं आहेत. कुंटुंब आहे. दोन वेळचे जेवण करायला किराणा भरावा लागतो. भाजीपाला आणावा लागतो. मुलांना खाऊ खरेदी करून द्यावा लागतो. आजारपण असतं. यासाठी पैसे कोठून आणणार, अशा प्रश्नांच्या सरबती लोखंडे यांनी उपायुक्त दराडे यांच्यावर केल्या. दराडे यांना लोखंडे यांच्या प्रश्नांचा खुलासा करता आला नाही. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून त्यांनी २७ नोव्हेंबरपर्यंत पगार शिक्षकांच्या खात्यावर जमा होईल, असे आश्वासन दिले. दराडे यांनी हे आश्वासन आंदोलनकर्ते शिक्षकांसमोर जाहीर केलं. महापालिकेने यावर देखील शिक्षकांचे पगार जमा केले नाहीत, तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू, असा इशारा अनंत लोखंडे यांनी दिला आहे. या आंदोलनात महिला शिक्षकांची संख्या जास्त होती.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.