संडे स्कुलमध्ये बालदिन साजरा !अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कपाळी कायम गुन्हेगार अशी ओळख असलेला पारधी समूह सतत भटकंती करत असतो. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर असलेल्या पारधी वस्तीतून गुन्हेगार जन्माला येत असताना आता बदलत्या काळात हा समूह कासवगतीने समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपडत आहे. या धडपडीला बळ देण्यासाठी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रयोगवन परिवाराच्या वतीने जामखेडच्या पारधी वस्तीवर संडे स्कुल हा सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला असून या उपक्रमाअंतर्गत पारधी वस्तीवरील शाळाबाह्य व नियमित शाळेत जाणाऱ्या मुलांना व्यक्तिमत्व विकासाचे व शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. आज दि १९ रोजी संडे स्कुलमध्ये बालदिन साजरा करण्यात आला.
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
आज रविवार दि १९ रोजी ..... वेळ सकाळी सडे नऊची... विचारणा नदीवरील काझेवाडी तलावाचे विस्तीर्ण जलाशय... पक्षांचा किलबिलाट... तलावाच्या सांडव्यातून कोसळणाऱ्या पाण्यातून वाहणाऱ्या विचारणा नदीत पोहण्याचा आनंद घेणारी माणसं.... निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या भागाची नजाकत काही औरच.... याच विचारणा नदीच्या तीरावर वसलेली पारधी वस्ती... समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर असलेल्या पारधी वस्तीतून अ आ इ ई चा आवाज घुमतोय हे एकूण तुम्हाला नवल वाटेल पण होय हे खरं आहे. 

सामाजिक क्षेत्रात कार्यरत जामखेड - कुसडगाव रस्त्यावरील काझेवाडी तलावाशेजारी असलेल्या पारधीवस्तीवर प्रयोगवनच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या संडे स्कुलमधील मुलांशी संवाद साधण्यासाठी पत्रकार खंडागळे व ओंकार दळवी हे आले होते. 

मुलांशी गप्पागोष्टी करत असताना शिक्षण कश्यासाठी घ्यायचं असतं ? हा प्रश्न मुलांना विचारताच कोणी ज्ञान मिळवण्यासाठी,कोणी मोठं होण्यासाठी, कोणी अधिकारी होण्यासाठी, अशी उत्तरं दिली मात्र शोभा या विद्यार्थिनीने दिलेले उत्तर खूप खास होते. "शोभा म्हणाली सर देशाला मोठं करण्यासाठच मला शिक्षण घ्यायचं " हे एकूण उपस्थित पाहुणे भारावून गेले. तिसरी वर्गात शिकणाऱ्या शोभाची प्रगल्भ समज वंचित घटकाच्या मागासलेलपणाला परिवर्तनाच्या नव्या दिशेने घेऊन जाणारी आहे असे खंडागळे म्हणाले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

दरम्यान संडे स्कुल मध्ये आज बालदिन साजरा करण्यात आला.संडे स्कुलमधील मुलांना दळवी व खंडागळे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले तसेच खंडागळे व दळवी यांनी बालदिनानिमित्त मुलांसाठी आणलेल्या खाऊचे वाटप करण्यात आले. दरम्यान मुंबई येथील दीपा परुळेकर- देसाई व नागपूर येथील सुजाता निंभोरकर यांनी संडे स्कुलमधील मुलांच्या आईसाठी पाठवलेल्या साड्यांचेही यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

संडे स्कुल मधील मुलांशी संवाद साधण्यासाठी अचानक आलेल्या प्रकाश खंडागळे व ओंकार दळवी यांचे स्वागत संडे स्कुलच्या वतीने शोभा या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रयोगवनचे अध्यक्ष सत्तार शेख यांनी केले तर आभार निलेश शिंदे यांनी मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.