वाळू तष्करांनी श्रीगोंद्यात तयार केले जबरदस्त नेटवर्क, तालुक्यातून दररोज ३६ लाखांची वाळू चोरी

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदे तालुक्यातील वाळू तस्कर दररोज ४ ब्रास वाळूच्या ८० गाड्या पुण्याला पाठवून ती वाळू १० हजार रुपये ब्रासने विकतात, त्यात त्यांना ३२ लाख रुपये मिळतात. तर श्रीगोंदे तालुक्यात दररोज ४ ब्रासच्या २० गाड्या पांच हजार रुपये ब्रासने विकून चार लाख रुपये कमवितात असे दररोज एकूण ३६ लाख रुपये वाळू चोरीतून मिळविले जात असून, हे सर्व करण्यासाठी वाळू तस्करांनी सर्व संबधितांना हप्त्यांनी बांधलेले आहे. संबध तालुक्यात टेहळणीदार ( पहारेकरी ) नेमून जबरदस्त नेटवर्क निर्माण केलेले आहे . असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी प्रा. तुकाराम दरेकर यांनी केला आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
प्रा. दरेकर म्हणाले, शासनाने ठेवलेले वाळूचे लिलाव हाणून पाडावयाचे आणि नंतर राजरोस वाळूची चोरी करावयाची हा नवा फंडा वाळू तस्करांनी सुरु केला आहे. हे सर्व करण्यासाठी यंत्रणेतील कर्मचा-यांना हप्त्यांनी बांधलेले आहे. ठिकठिकाणी रोजंदारीवर पहारेकरी नेमलेले आहेत.

तहसीलदार आणि पोलिसांच्या गाडीवर हे पहारेकरी पाळत ठेवतात. गाडी श्रीगोंद्यातून निघाली की , ती कोणत्या रस्त्याला लागते ? हे पाहून त्या बाजूच्या वाळू उपासणा-या यंत्रांना आणि वाहतूक करणा-या वाहनांना हॉटसअप आणि मोबाईल वरून सावध केले जाते. शासनाचे वाहन स्पॉटवर पोहचण्यापूर्वी तेथील वाळू उपसणारे यंत्र आणि वाळू वाहणारी वाहने पसार केली जातात..
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

पाहरेकरी एकदम तत्पर राहतात आणि पथकातील कर्माचारी देखील वाळू तश्करांशी लागे- बांधे ठेवून त्यांना जागे करतात. त्यामुळे वाळू चोरी विरोधी पथकाला वाळूची चोरी सापडणे अवघड झाले आहे. श्रीगोंदे तालुक्यातील ओढे उकरताना वाळू तश्कर ओढ्याच्या शेजारी असणा-या शेतक-यांना आमिष दाखवून ओढ्याच्या लगतची शेते उकरली जातात. 

काही शेतकरी वाळू तश्करांकडून पैसे घेऊन दुस-याच शेतक-यांची शेते दाखवितात. हा माझा स्वत:चा अनुभव आहे. अंबील ओढ्याच्या काठावर असणा-या माझ्या मालकीच्या गट नंबर १५६९ मध्ये वाळू तश्करांनी वाळू काढली. चौकशी केल्यावर त्यांनी सांगितलेकी आम्ही एका शेतक-याला पैसे दिल्यावर त्याने हा स्पॉट दाखविला. शेतक-याला स्वत:च्या शेतातील तीन फुट खोलीच्या खालील गौण खनिज विकण्याचा अधिकार नाही. चिरीमिरीसाठी जे शेतकरी आपल्या शेतातील गौण खनिज विकतील त्यांच्यावर शासनाने गुन्हे दाखल केले पाहिजेत.

एवढी मोठी वाळू चोरी चालू असतांना महसूल आणि पोलीस यंत्रणेत आजीबात मेळ नाही. श्रीगोंदा तहशिलदार यांच्याकडे सध्या वाहन नाही आणि पोलिसांच्या वाहनावर विसंबून काहीही कारवाई होत नाही. महाराष्ट्र शासनाने जून २०१५ पासून वाळू चोरीवर बाजारमूल्याच्या पाच पट दंड ठेवलेला आहे. एक ब्रास वाळू चोरणाराला ५० हजार रुपये दंड होतो. ४०० ब्रास वाळूच्या चोरीवर दंडाची आकारणी झाली तर शासनाला दररोज २ कोटी दंड वसूल करता येऊ शकतो. त्यासाठी मात्र प्रामाणिक यंत्रणेची आवश्यकता आहे.

वाळू तश्करांच्या पहारेक-यांवर आणि खब-यांवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी एकत्र बसून पोलीस आणि महसुलची चौदा पथके निर्माण करून दररोज दोन पथके पेट्रोलिंगवर पाठविली तर एका पथकाच्या वाट्याला वाळूचे पांच स्पॉट येतील. गावोगावच्या पेट्रोलिंग बरोबर वाळू स्पॉटचे दररोज पेट्रोलिंग केले तर खबरे आणि पहारेकरी काहीही करू शकणार नाहीत. रोज पेट्रोलिंगची गाडी वेळ बदलून पाठविल्यास वाळू तश्करांवर दहशत बसेल आणि वाळू चोरी थांबेल. वाळू चोरी थांबली तर वाळूचे लिलाव घेण्याशिवाय त्यांना पर्याय राहणार नाही. त्यामुळे शासनाचा महसूल वसूल होऊ शकेल.

ज्या गावातून वाळू चोरी होते त्या गावच्या तलाठ्यांवर आणि मंडळाधिका-यांवर जबाबदारी निश्चित करावी. त्यात कुचराई करणारांवर कारवाई केली जावी. अखेर नोकरी महत्वाची असल्याने त्यांना सतर्क राहावे लागेल . वाळू चोरी मध्ये नगरसेवक, पत्रकार, पक्ष पदाधिकारी, गावोगावचे नेते आणि काही पोलीस देखील सामील झालेले असतात ,असेही प्रा. दरेकर म्हणाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.