‘त्या’ नराधमांना सार्वजनिक ठिकाणी फाशी द्या

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :माझ्या मुलीचे लचके तोडणाऱ्या नराधमांचेही लचकेच तोडले पाहिजे. त्यांना सार्वजनिक ठिकाणी फाशी द्यावी, म्हणजे राज्यात पुन्हा कोणी मुलीवर बलात्कार करणार नाही अशा शब्दात कोपर्डी प्रकरणातील पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी भावना व्यक्त केल्या.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
कोपर्डी प्रकरणाची शनिवारी विशेष जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यापुढे सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान ग्रामस्थांनी न्यायालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सुनावणीच्या वेळी न्यायालयात अधिक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

न्यायालयाच्या निकालानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी न्यायालयाच्या निकालावर समाधान व्यक्त केले. नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. माझ्या मुलीचे हाल करुन तिची हत्या करण्यात आली. या नराधमांचेही लचके तोडायला पाहिजे, त्यांना सार्वजनिक ठिकाणी फाशीची शिक्षा दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

कोपर्डीत १३ जुलै २०१६ रोजी १५ वर्षांच्या मुलीची बलात्कार करुन हत्या करण्यात आली होती. पीडित मुलगी आजोबांच्या घरी जात असताना नराधमांनी दुचाकीवरुन तिचा पाठलाग केला आणि गावातील निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार करुन तिची हत्या केली होती. या प्रकरणात न्यायालयात ३५० पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. सरकारी पक्षाने ३१ तर बचाव पक्षाने १ साक्षीदार तपासला होता..

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.