खरच विकास केला तर जाहिरातींची गरजच काय?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सध्याच्या सरकारचा फक्‍त जाहिरातीवर खर्च चालू आहे. शेतकरी, गोरगरिबांना वाऱ्यावर सोडले. मग कोण लाभार्थी झाले याचे उत्तर द्या, जर तुम्ही खरा विकास केला असेल तर तुम्हाला स्वत: जाहिराती करायची गरज काय? खऱ्या लाभार्थींना करू द्या ना जाहीरात, अशी घणघणाती टीका विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
राहाता तालुक्‍यातील वाकडी येथे विविध विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी वाकडी-लांडेवाडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण तसेच गावठाण मुख्य रस्ता, हनुमान मंदिर ते स्वामी समर्थ मंदिर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण व तलाठी नूतन कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात आले. अध्यक्ष्यस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे होत्या.

राधाकृष्ण विखे म्हणाले की, सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली. त्यात राज्यातील सर्वच सत्ताधारी, स्थानिक आमदारांनी अभिनंदनाचे फ्लेक्‍स लावले. नंतर ते काढण्याची नामुष्कीही त्यांच्यावर आली. कर्जमाफी करावयाची होती, तर त्यांची अर्ज भरून घेण्याची पद्धत किचकट का होती? तुम्ही या योजनेला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले. यात तुम्ही महाराजांचा तर अवमान केलाच पण शेतकऱ्यांची सुध्दा थट्टा केली. याचे भोग तुम्हाला भोगावेच लागणार आहेत. सरकार नोटबंदी तसेच अनेक मुद्यावर अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

शालिनी विखे म्हणाल्या की, अगोदरच्या कार्यकाळातही भरपूर कामे केली आणि आताही कोणताही गटतट न पाळता विकासकामांना गती दिली आहे. अंगणवाडी, दलितवस्ती योजना, पाणी पुरवठा तलाव, श्री क्षेत्र खंडोबा देवस्थानचा “क’ वर्गातून श्रेणी “अ’मध्ये सामावेश व्हावा, यासारखे प्रश्‍न लवकरच मार्गी लावणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी यावेळी त्यांनी वाकडीकरांना दिले. तसेच आगामी ग्रामपंचायत निवडणूक ही बिनविरोध करुन त्यातून गावाचा विकास घडवा, असे आवाहनही त्यांनी केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.