कोपर्डी प्रकरणात तिन्ही आरोपी दोषी २१ आणि २२ नाव्हेंबरला सुनावणी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोपर्डी बलात्कार आणि हत्येप्रकरणी अहमदनगर कोर्टाने आज (शनिवार) तिन्ही आरोपींना दोषी ठरवले. मुख्य आरोपी संतोष भवाळ, जितेंद्र शिंदे आणि नितीन भैलूमे याने कटकारस्थान करून अत्याचार, हत्येचा आरोप सिद्ध झाले आहेत.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
२१ व २२ नोव्हेंबरला या खटल्यातील शिक्षेबाबत युक्तीवाद करण्यासाठी सुनावणी असून तिघांना यानंतर शिक्षा सुनावली जाणार आहे. नराधमांना कोर्ट काय शिक्षा सुनावते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

प्रमुख आरोपी पप्पू उर्फ जितेंद्र शिंदे याला अत्याचार खून या कलमांखाली दोषी ठरविण्यात आले आहे तर आरोपी संतोष भवाळ व नितीन भैलुमे यांना संगनमत करुन कट करणे व गुन्ह्यासाठी प्रोत्साहीत करणे यासाठी दोषी ठरवले आहे़ बाललैंगिंक कायद्यानुसारही तिघांना दोषी ठरविण्यात आले आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

खून व अत्याचाराच्या गुन्ह्यात फाशी व जन्मठेपेची तरतूद असून, कट रचणे व गुन्ह्यासाठी प्रोत्साहित करणे यासाठी जन्मठेपेची तरतूद आहे, असे न्यायालयाने सांगितले. २१ नोंव्हेबरला नितीन भैलुमे याच्या शिक्षेवर युक्तीवाद करण्यासाठी तर २२ नोव्हेंबरला जितेंद्र शिंदे व संतोष भवाळ यांच्या शिक्षेवर युक्तीवाद करण्यासाठी सुनावणी होणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.