दारुच्या नशेत पत्नीला जाळून ठार मारनाऱ्या पतीला जन्मठेप

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पत्नीला दारुच्या नशेत शिवीगाळ करुन अंगावर रॉकेल ओतून जाळून ठार मारल्याच्या आरोपावरुन जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एन.एन. श्रीमंगले यांनी आरोपी तुकाराम शिवराम ढेपे (रा. नान्नज, ता. जामखेड) याला दोषी धरुन जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
-------------------------------
या खटल्याची सविस्तर माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील नान्नज येथे आरोपी तुकाराम ढेपे व त्याची पत्नी मयत शोभा हे एकत्रित राहात होते. दि. १५/९/२०१६ रोजी आरोपी तुकाराम नेहमी प्रमाणे दारु पिवून आला होता. त्याने घरात आल्यावर पत्नी शोभा हिस शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी मयत शोभा हिने पतीला तुमचे रोजचेच आहे शिव्या कशाला देता असे म्हणाल्याचा राग पती तुकाराम याला आला त्याने लगेच धरातील रॉकेलचा ड्रम घेवून त्यातील रॉकेल पत्नी शोभाच्या अंगावर ओतून काडीपेटीने पेटवून दिले.

त्यावेळी तिच्या साडीने पेट घेतला त्यावेळी तिने जोरजोरात आरडाओरड केली तेव्हा तिची चलत जावू वैजयंता ढेपे व शेजारी पाजारी लोकांनी शोभा हिच्या अंगावर पाणी टाकून तिला विझविले. त्यात शोभाचा चेहरा दोन्ही हात, छाती, पोट, पाठ, पाय भाजून ती गंभीर जखमी झाली होती. तिला शेजाऱ्यांनी उपचारार्थ प्रथम जामखेड येथील दवाखान्यात व नंतर नगरच्या सिटिकेअर हॉस्पिटलमध्ये त्यानंतर सिव्हील हॉस्पिटल येथे दाखल केले. 

उपचार घेत असताना दि. १६/९/२०१६ रोजी शोभा हिचा सिटिकेअर हॉस्पिटल रुबी कॅथलॅब येथे नायब तहसीलदार एस.एस.पाखरे यांनी डॉ. प्रशांत कुलकर्णी यांच्या तपासणी अंती मृत्यूपूर्व जबाब घेतला होता. तसेच जखमी शोभा सिव्हील हॉस्पिटल येथे उपचार घेत असताना तिचा सहाय्यक फोजदार जे.जी. बटुळे यांनी डॉ. अश्विनी सोनवणे यांच्या तपासणीअंती दि. १६/९/२०१६ रोजी मृत्यूपूर्व जबाब घेतला. त्यानंतर दि. १९/९/२०१६ रोजी शोभा मयत झाली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

मयताचे शवविच्छेदन डॉ. मनाज घुगे यांनी केले. या गुन्ह्याचा तपास पीएसआय संजय मातोंडकर यांनी केला. या खटल्यात सरकारपक्षातर्फे एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यात साक्षीदार वैजयंता ढेपे व उत्तम ढेपे हे घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असताना केवळ आरोपी त्यांचा नातेवाईक असल्याने त्यांनी सरकार पक्षाला मदतत न केल्याने त्यांना फुटीर म्हणून घोषीत करण्यात आले. 

सरकार पक्षातर्फे तपासण्यात आलेल्या इतर साक्षीदारांनी दिलेली साक्ष, दाखल कागदपत्रे, आणि परिस्थिती जन्य पुरावा ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपी तुकाराम ढेपे याला जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकिल ॲड. केदार गोविंद केसकर यांनी काम पाहिले त्यांना जिल्हा सरकारी वकिल ॲड. सतीश पाटील, ॲड. अनंत फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. तसेच ॲड. केसकर यांना सरकारी वकिल ॲड. अनिल सरोदे, ॲड. राहुल पवार, पोलिस कर्मचारी यादव यांनी मदत केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.