आज मिळणार नगरच्या निर्भयास न्याय ?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्यभर गाजलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार खून खटल्याचा निकाल आज सुनावला जाण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे राज्यातील राजकीय सामाजिक वातावरण ढवळून निघाले होते. या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, पीडित मुलीला न्याय मिळावा, या मागणीसाठी राज्यभर मोर्चे निघाले होते. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे १३ जुलै २०१६ रोजी नववीत शिक्षण घेत असलेल्या १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून झाला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर १५ जुलै २०१६ रोजी या गावातील आरोपी जितेंद्र बाबूलाल शिंदे याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर १६ जुलै रोजी संतोष गोरख भवाळ, नितीन गोपीनाथ भैलुमे या दोघांना अटक झाली होती.

या खटल्याचा निकाल शनिवारी लागणार असून, या निकालाकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागलेले आहे. या खटल्यासाठी न्यायालयाच्या आवारात दोन स्ट्रायकिंग फोर्स व ७० पोलिस कर्मचाऱ्यांचा पोलिस बंदोबस्त असणार आहे. घटना घडलेल्या कोपर्डी गावात ५० पोलिस कर्मचारी व स्टायकिंग फोर्स असणार असून, जिल्ह्यात दक्षता घेण्यात आली आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
निकाल एेकण्यासाठी ध्वनीवर्धक
या खटल्याचा निकाल एेकण्यासाठी न्यायालयात गर्दी होणार असल्याचे गृहित धरून न्यायालयाकडून निकाल ऐकण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. न्यायालयाच्या इमारतीच्या आवारात दोन ध्वनीवर्धक लावण्यात आले असल्याची माहिती न्यायालयाच्या प्रशासनाकडून मिळाली आहे. न्यायालयाच्या आवारात स्पीकर लावावेत, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. नवीन न्यायालयात पहिल्यादांच या खटल्यासाठी ध्वनीवर्धक लावण्यात आले आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.