शेतकऱ्यांच्या छातीवर गोळ्या झाडायला नको होत्या - रावसाहेब दानवे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पोलिसांनी ऊसदरासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या छातीवर गोळ्या झाडायला नको होत्या, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले आहे. ‘पोलीस शेतकऱ्यांच्या पायावर गोळी मारु शकत होते. मात्र त्यांनी छातीवर गोळ्या झाडल्या. पोलिसांची ही कृती चुकीचीच आहे,’ असे दानवे यांनी म्हटले. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
गुरुवारी दानवेंनी ऊसदर आंदोलनात जखमी झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी या घटनेबद्दल प्रसारसामाध्यमांना प्रतिक्रिया दिली. शेवगावमध्ये बुधवारी ऊसदरासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन शेतकरी जखमी झाले. या जखमी शेतकऱ्यांची दानवेंनी भेट घेतली. यावेळी त्यांनी जखमी शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी माहिती दिली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

यावेळी बोलताना, पोलिसांकडून झालेला गोळीबार चुकीचाच असल्याचे ते म्हणाले. ‘गोळीबार छातीवर करायचा नसतो. मात्र जमावावर ज्याप्रकारे गोळ्या झाडण्यात आल्या, ती कृती चुकीचीच आहे. पोलीस पायावर गोळी झाडू शकते. मात्र ती छातीवर लागली. पोलिसांचे हे कृत्य अयोग्य आहे,’ असे दानवे यांनी म्हटले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.