कोपर्डीचा निकाल काहीही लागो तो सर्व जाती धर्माच्या लोकांनी संयमाने घ्यावा

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोपर्डीचा निकाल काहीही लागो तो सर्व जाती धर्माच्या लोकांनी संयमाने घ्यावा असे आवाहन प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी कर्जत येथील शांतता कमिटीच्या बैठकीत केले. कर्जत पंचायत समिती सभापतीच्या दालनात हि मर्यादित लोकाची बैठक संपन्न होऊन औपचारिकता पूर्ण करण्यात आली. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
महाराष्ट्र गाजवून टाकणाऱ्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी घटनेचा न्यायालयीन निकाल दि १८ नोव्हे रोजी लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत येथे पोलीस प्रशासनाच्या वतीने अधिकार्यासह शांतता कमिटीची बैठक पंचायत समिती सभागृहात सकाळी १०-३० वा आयोजित करण्यात आली होती. 

मात्र बैठक थेट सव्वा बारा वाजता सुरु झाली. पोलीस निरीक्षक वसंत भोये यांनी प्रास्ताविक करताना कोपर्डी प्रकरणाचा निकाल लागणार असून त्याच्या पार्श्वभूमीवर शांतता रहावी म्हणून हि शांतत्ता कमिटीची बैठक आयोजित केली असल्याचे सांगून पोलीसाच्या वतीने योग्य तो बदोबस्त ठेवण्यात आलेलाच आहे मात्र तरीही आपण सर्वांनी जागृती करून शांतता राखण्यासाठी मदत करावी असे आवाहन केले.

नष्टे यांनी या विषयावर आपण चर्चात्मक बैठक करू अशी भूमिका मांडली यावेळी आरपीआयचे युवा जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर भैलुमे यांनी कर्जत तालुक्यात यापूर्वी कधीहि अनुचित प्रकार घडला नाही व पुढे हि घडणार नाही असे म्हटले. बैठकीस राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील, पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुंड, शिवसेनेचे अमृत लिंगडे, कुळधरणचे सरपंच अशोकनाना जगताप, आरपीआयचे दत्ता कदम व रविंद्र दामोदरे, नारायण नेटके, कोंडीराम खामगळ, मनोज लातूरकर आदी फक्त दहा लोकच उपस्थित होते. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

न्यायालयावर विश्वास ठेऊन सर्व समाजाने हा निकाल स्वीकारून शांतता राहील यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन करताना हि बैठक सर्व अधिकार्याच्या उपस्थितीत घ्यायची होती मात्र एनवेळची कामे निघाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी याचेसह काही अधिकारी उपस्थित राहू शकले नाहीत असे म्हणत प्रांताधिकारी यांनी बैठक पूर्ण केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.