स्वच्छता विभागाच्या बैठकीसाठी मुख्याध्यापक वेठीस.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :स्वच्छता कक्षाच्या कामासाठी मागे राहिलेल्या गावातील शाळाच्या मुख्याध्यापकांना कर्जत मध्ये बैठकीस बोलावून अधिकारी मात्र दोन तास तीकडे फिरकलेच नाहीत यावर प्रांताधिकारी यांना विषय समजून घेण्याचा आग्रह धरला असता त्यांनी बैठकीत येऊन उपस्थित असलेल्या शिक्षणच्या अधिकार्यांनाच झापायला सुरुवात केली व अनुपस्थित अधिकार्याना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला यावर पत्रकारांनी वस्तुस्थिती समजून घेण्याचे म्हटले असता तुम्ही मला शिकवू नका असे म्हणून बैठकीतूनच निघून जाणे पसंत केले. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
कर्जत पंचायत समिती सभागृहात गटविकास अधिकार्याच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील ज्या गावात हागणदारी मुक्तीचे काम राहिले आहे त्या गावातील शाळेच्या फक्त मुख्याध्यापकाची बैठक आज सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आपण आला नाहीत तर कारवाई केली जाईल असा बडगा उगारला गेला होता. 

सदर बैठकीला त्या गावातील ग्रामसेवक सरपंच वा इतर कोणतेही अधिकारी बोलावले नव्हते, व्हाटसअप वर मिळालेल्या या निरोपाने सर्व शाळांचे मुख्याध्यापक पावणे दहा पासून सभागृहात हजर होते. मात्र दुपारी साडे बारा पर्यत बैठकीसाठी मुख्याध्यापक बसलेल्या सभागृहात पंचायत समितीचा एक हि अधिकारी फिरकला नाही. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

कोपर्डी प्रकरणाच्या निकालाचे पार्श्वभूमीवर याचठिकाणी शांतता कमिटीची बैठकहि पोलिसांनी आयोजित केली होती. शांतता कमिटीच्य बैठकीसाठी पत्रकार आलेले असताना शाळा सोडून बैठकीविना सभागृहात अधिकाऱ्याविना दोन तासापासून बसलेले मुख्याध्यापक त्याचे निदर्शनास आले.  

पत्रकारांनी दोन तासापासून मुख्याध्यापक बैठकीस सभागृहात बसून असल्याची बाब गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे यांना फोन केला असता आपण एका कर्मचार्याचे वडील वारले असल्याने अंत्यविधीस आलो असल्याचे म्हटले तर हि परिस्थिती तहसीलदार किरण सावंत यांना दूरध्वनीवर कळवली असता त्यांनी आपल्यापुढे केसेस सुरु असल्याने येण्यास असमर्थता दर्शवली, मात्र काही वेळात प्रांताधिकारी अर्चना नष्टे शांतता समितीच्या बैठकीस तेथे येत असल्याचे म्हटले. काही वेळाने प्रांताधिकारी आल्या, त्यांनी सभापतीचे दालनात बैठक घेतल्यानंतर दुपारी साडेबारा पर्यंत हि या मुख्याध्यापकाच्या बैठकीकडे कोणीही फिरकले नव्हते. 

त्यामुळे प्रांताधिकारी यांनी सदरच्या शासकीय यंत्रणेतील अनागोंदी कारभार पहावा व त्याबाबत वरिष्ठाना अहवाल पाठवावा असा आग्रह उपस्थितांनी धरला. मात्र जे अधिकारी उपस्थित नाहीत त्याची बाजू मला विचारात घ्यावी लागेल असे म्हनत त्यानी बैठकीकडे येणेस टाळण्याचा प्रयत्न केला यावर उपस्थित चार पत्रकारानी त्यांना परिस्थितीचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले. 

प्रांताधिकारी सभागृहात आल्या व त्यांनी उपस्थित असलेल्या शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकार्यांनाच झापायला सुरुवात केली. अधिकारी येणार नव्हते तर ते तुम्हाला यांना सांगायला येत नव्हते का असे म्हणत होत्या यावेळी शिक्षक त्याच्या अडचणी सांगत असताना त्या ऐकून घेण्याची त्याची मानसिकता नव्हती. अधिकार्यांना कामे असतात असे म्हणत वस्तूस्थितीचा विपर्यास करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 

परिस्थिती व विषय समजून न घेता व वरिष्ठ म्हणून काय करणे यावेळी अपेक्षित आहे हे लक्षात न घेता अधिकार पदाच्या धाकात घेण्याचा त्याचा प्रयत्न होता. अधिकार्याची बाजू ऐकून घेतल्या शिवाय मला काहीहि करता येणार नाही असे म्हणत उपस्थितांना तुम्ही मला शिकवू नका मला माझी जबाबदारी समजते तुम्ही कोण मला सांगणारे असे उत्तरे त्या देत समोरच्या बोलणार्यावर दबाब टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 

यावेळी एका पत्रकाराने त्यांना वस्तूस्थिती समजून घ्या असे म्हणत जर या शिक्षकाच्या गावातील दहा लोक गावात जमले व त्यांनी शाळेला टाळे ठोकले तर त्याला जबाबदार कोण असा प्रतीप्रश्न करत आम्ही तुम्हाला कोणतीही प्रतिक्रिया द्या असे म्हणत नाहीत पण या सर्व बाबीना जबाबदार कोण हे फक्त कागदावर घ्या तुम्ही दोन तालुक्याच्या प्रमुख आहात व शिक्षण सारख्या विभागाचा कसा खेळखंडोबा केला जातो आहे त्यावर उपाययोजना करा असेच थेट सुनावले. 

यावेळी होणार्या वादावादीचे पत्रकार चित्रीकरण करत असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी ते बंद करण्यास सांगितले पत्रकारांनी चित्रीकरण बंद हि केले मात्र प्रांताधिकारी यांनी बैठकीतून अचानक उठून जाणेच पसंत केले. यावेळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील, आरपीआयचे युवा जिल्हाध्यक्ष भास्कर भैलुमे यांनी अधिकार्याची हि पद्धत योग्य नसल्याची प्रतिक्रिया पत्रकाराजवळ व्यक्त केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.