कुकडीचे पहिले आवर्तन १५ डिसेंबर रोजी सुटणार - आमदार राहुल जगताप.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कालवा सल्लागार समितीची बैठक आज मुंबई येथे जलसंपदा मंत्री गिरिशजी महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये घोड व कुकडी रब्बी हंगामाच्या आवर्तनाचे नियोजन करण्यात आले. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
यंदा घोड १०० टक्के भरलेले आहे. कुकडी प्रकल्पात २८ टीएमसी ८५ टक्के पाणी साठा आहे योग्य नियोजन केल्यास सर्वाना पाणी मिळेल. यादृष्टिने या नियोजन बैठकीमध्ये कुकडी प्रकल्पासाठी ४ आवर्तने व घोड प्रकल्पासाठी ४ आवर्तनाचे नियोजन करण्यात आले आहे.


यापैकी २ आवर्तने ही रब्बी हंगामासाठी व २ आवर्तने उन्हाळ्यामध्ये होणार असून पहिले आवर्तन कुकडीचे १५ डिसेंबर २०१७ तर घोडचे आवर्तन हे २५ डिसेंबर २०१७ ला सुटणार आहे. अशी माहिती आमदार राहुल जगताप यांनी दिली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

या बैठकीस मा. अध्यक्ष विधानसभा दिलीपराव वळसे पाटील, आमदार राहुल जगताप आमदार बाबूराव पाचरणे राजेंद्र नागवड़े, मुख्य अभियंता श्री.रजपुत ,अधिक्षक अभियंता श्री. वानखेडे ,कार्यकारी अभियंता श्री.कोळी तसेच पाटबंधारे खात्याचे अधिकारी उपस्थित होते. 

पाण्याचा अपव्यय होणार नाही कमी पाण्यात आवर्तन होवुन सर्वांना व्यवस्थित पाणी मिळावे या दृष्टीने नियोजन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच तालुक्यातील सर्व शेतक-यांना पाणी कसे जाईल याचे अधिका-यांनी आतापासुनच नियोजन करावे हलगर्जीपणा करणार्या कर्मचा-यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आमदार राहुल जगताप यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.