पारनेर तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांबाबत भाजपचे बाळासाहेब नरसाळे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पारनेर तालुक्याच्या दौर्यावर आले असताना यांची भेट घेवून भाजपचे युवा नेते, पारनेर सैनिक बँकेचे संचालक बाळासाहेब नरसाळे यांनी पारनेर तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांबाबत मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
मुख्यमंत्र्याना दिलेल्या निवेदनात त्यांनी सुपा MIDC मध्ये स्थानिक युवकांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी देण्याची तसेच माजी सैनिकांना उद्योग धंद्यांसाठी MIDC मध्ये भुखंड आरक्षित करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
तसेच पारनेर दुष्काळग्रस्त तालुका म्हणुन ओळखला जातो आज स्पधेच्या युगामध्ये इंग्रजी काळाची गरज आहे परंतु आर्थिक परस्थीती खराब आहे इंग्रजी शिक्षण खिशाला न परवडणारे आहे त्यामुळे शिक्षणापासुन वंचित रहातात. इंग्रजी माध्यमाचे शिक्षण निशुल्क करण्यात यावे व अशा शाळांना अनुदान देण्यात यावे, युवक - युवतींना तालुकास्तरावर हॉस्टेल्सचे निर्माण करण्यात यावे, स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राची उभारणी करण्यात यावी, MSCIT व कॉम्प्युटर कोर्स मोफत केल्यास डीजीटल इंडियाचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल, तालुका स्तरीय मुक्तांगण केंद्र उभारण्यात यावे युवक व्यसनांपासुन दुर करण्यात मदत होईल आदी मागण्या केल्या आहेत.

------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.