रस्त्याच्या कामासाठी मनसेचे भिक मांगो आंदोलन.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीरामपूरमधील गोंधवणी रस्ता नसून 'मौत का कुऑँ' झालेला आहे. या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे अनेक अपघात होवून नागरिकांना गंभीर दुखापत झाली आहे. डांबरीकरणानंतर दोन-तीन महिन्यांतच या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, पालिकेने नागरिकांच्या जीवाशी खेळू नये, असे सांगून रस्त्याच्या कामासाठी निधी नसल्याने आज मनसेच्या वतीने गोंधवणी रस्त्यावरील बसस्थानकाजवळ भीक मांगो आंदोलन करण्यात आले. दरम्यान, मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी निवेदन स्वीकारून दोन-तीन दिवसात खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.

मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गोंधवणी रस्त्यावरील बसस्थानाजवळ आज सुमार दोन तास आंदोलन करण्यात आले. यावेळी नगरसेवक श्यामलिंग शिंदे, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष तुषार बोबडे, तालुकाध्यक्ष सोमनाथ धनगर, शहराध्यक्ष प्रशांत कहाणे, तालुका सचिव डॉ. संजय नवथर, विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष सागर खरात आदी उपस्थित होते. शिंदे म्हणाले, गोंधवणी रस्त्याच्या दुरावस्थेसंदर्भात वेळोवेळी निवेदने देण्यात आली. डांबरीकरणानंतर दोन-तीन महिन्यातच रस्त्याचे दुरवस्था झाली आहे. याला सर्वस्वी संबंधित ठेकेदार व पालिकेतील बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
रस्त्याचे काम अत्यंत नित्कृष्ट दर्जा झाल्याने एक-दोन पावसातच रस्ता मातीसारखा वाहून गेला. संबंधितांवर पालिकेने केलेल्या कारवाईची माहिती द्यावी. तसेच या रस्त्यावरून दुचाकीवरून पडल्याने निमगावखैरी येथील एकाचा मृत्यू झाला, तर गोंधवणी परिसरातील केबल ऑपरेटला गंभीर दुखापत झाली. अनेक विद्यार्थी व पालकांचाही किरकोळ अपघात झाले आहेत. 

पालिकेने तातडीने रस्त्यावरील खड्डे बुजवावेत. नागरिकांबाबत कोणताही भेदभाव न करता त्यांच्या जीवाशी खेळू नये. भीक मांगो आंदोलनातून जमा झालेले पैसे रस्त्याच्या कामासाठी वापरावे, अशी खोचक प्रतिक्रियाही व्यक्त करून आठ-ते दहा दिवसांत कामास सुरवात न झाल्यास पालिकेचे गेटबंद आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.