कर्जत तालुक्यातील दलितवस्ती सुधार योजनेतील निधी अखर्चित.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कर्जत तालुक्यातील दलितवस्ती सुधार योजनेतील ४८ कामांचे १ कोटी ६८ लाख रुपये अखर्चित राहिला असल्याची बाब निदर्शनास आली आहे. ग्रामीण भागात निधी मिळण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागत असताना मजूर झालेला निधी अखर्चित राहणे ही बाब गंभीर आहे. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
प्रत्येक गावातील वंचित घटकांच्या विकासासाठी, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करण्यासाठी शासन मोठया प्रमाणावर निधी देत असते. तो निधी दोन वषांर्च्या आत त्या त्या कामावर खर्च करणे गरजेचे असताना कर्जत तालुक्यातील दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत आलेला निधी कामे सुरूच न झाल्याने अखर्चित राहिला आहे. 

याबाबत मिळालेल्या माहिती अशी की, २०१४-१५ व १०१५-१६ या दोन वर्षात या योजनेत मंजूर झालेल्या कामापैकी ४८ कामे त्या गावांनी सुरूच केली नाहीत. दोन वर्षांची मुदत संपताच कामे रद्द केली. त्यामुळे कर्जत तालुक्यातून १ कोटी ६८ लाख रुपये निधी अखर्चित राहिला आहे
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत विविध गावांसाठी मोठया प्रमाणात दरवर्षी निधी मंजूर.होत असतो. मात्र हा निधी योग्य पद्धतीने खर्च केला जात नाही.

कर्जत तालुक्यात दलितवस्ती सुधार योजनेची गांभीर्याने अंमलबजावणी केली जात नाही, त्यामुळे खरे गरजवंत लाभ मिळूनही वंचित राहत आहेत. कर्जत पंचायत समितीचे बीडिओ, विस्ताराधिकारी व बांधकामचे अभियंता कार्यालयात कधीच भेटत नाहीत, अशी प्रतिक्रिया आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश भैलुमे यांनी दिली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.