शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील, अशी अपेक्षा आता राहिलेली नाही - राधाकृष्ण विखे पाटील.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्यात संवेदनाहीन सरकार असल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील, अशी अपेक्षा आता राहिलेली नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांचा रस्त्यावर उद्रेक आला आहे. हा उद्रेक सरकार दडपशाही करून मोडू शकणार नाही, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.



----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
शेवगाव येथे पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेल्या शेतकऱ्यांची विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज गुरूवार दि.१६ रोजी रूग्णालयात जावून भेट घेतली. यावेळी त्यांनी रूग्णालयात डॉक्टरांशी चर्चा करून शेतकऱ्यांवरील उपचाराबाबत माहिती घेतली.

रुग्णालयाला भेट दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विखे पाटील म्हणाले की, शेवगाव येथे शेतकरी त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते. पण आंदोलक आणि व्यवस्थापन यांच्यात समन्वय साधण्यात प्रशासनाला अपयश आले. ही घटना अतिशय निषेधार्ह आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
सध्याचे सरकार हे पोकळ घोषणा व जाहिरातबाजीत मग्न आहे. शेतकऱ्यांसाठी केलेल्या घोषणांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही, हे कर्जमाफी योजनेच्या ढिसाळ अंमलबजावणीतून दिसून आले आहे. शेतकरी आपल्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. त्यांच्याशी सरकारने चर्चा करण्याऐवजी दपडपशाही करून आंदोलन मोडून काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Blogger द्वारा समर्थित.