शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी : अजित पवार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सध्याचे सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे.त्यामुळेच शेतकऱ्यांवर ही दुर्दैवी वेळ आली आहे. या शेतकरी विरोधी सरकारमुळेच पोलिसांत थेट शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याची ताकद आली. तरी या गोळीबार प्रकरणाची सखोल चौकशी करावी. शेतकऱ्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.असे मत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केले.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
काल शेवगाव तालुक्यातील घोटण, खानापूर येथील ऊस दराबाबत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला. यात दोन शेतकरी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर अहमदनगर शहरातील मॅक्सस्केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
या जखमी शेतकऱ्यांची आज दि.गुरूवार दि. १६ रोजी अजित पवार यांनी रूग्णालयात जावून त्यांची चौकशी केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत आमदार संग्राम जगताप, नगरसेवक संपत बारस्कर, कुमारसिंह वाकळे आदी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.