श्रीगोंदा पोलिसांनी पकडला साडे चार किलो गांजा

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  श्रीगोंदा पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी गांज्या घेऊन जाणाऱ्या दोघांना पकडले असून, त्यांच्याकडून ४५ हजार ८०० रूपये किमतीचा ४ किलो ५८० ग्रॅम वजनाचा गांज्या हस्तगत केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विजय राजाराम साळवे(वय - ३०) व त्याचा भाऊ भीमराव राजाराम साळवे(वय ३५) रा. सिद्धार्थ नगर, टेंभुर्णी ता.माढा,जि. सोलापूर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
याबाबत माहिती अशी की काल दि.१६ रोजी सायंकाळी श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांना गुप्त बातमीदारामार्फत दोघेजन श्रीगोंदा कारखाना परिसरात गांजा घेऊन आल्याची माहिती समजली, त्यावरून पो नि पोवार यांनी स्वता तात्काळ त्यांचे सहकारी सहायक पो नि निलेश कांबळे, सहायक फौजदार फरांदे,पो ना साठे,वैराळ, केशव व्हरकटे, धांडे,चालक शिरसाठ व औटी यांच्यासह श्रीगोंदा कारखाना परिसर गाठला.

त्याठिकाणी जगदंबा दूध उत्पादक संघाच्या पाठीमागील रोडवर हे दोन ईसम दुचाकीवरून जाताना आढळले. पोलिसांनी त्यांना हटकले असता ते पळून जाऊ लागले पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पकडले. यावेळी पोलीस व आरोपींमध्ये झटापट झाली. पोलिसांनी पकडून या आरोपींची झडती घेतली असता, त्यांच्याजवळील सॅकमध्ये या गांज्याचे दोन पुडके सापडले. 

सदर ४ किलो ५८० ग्राम गांज्या किंमत ४५ हजार ८०० रूपये व दुचाकी एम.एच. ४५ व्ही.२८४७ ही ४० हजार रूपये असा ऐकूण ८५ हजार ८०० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर आरोपींनी कर्नाटकवरून हा गांजा आणला असून, ते कारखाना परिसरात एका व्यक्तीला हा गांजा देण्यासाठी आले होते. परंतु त्या व्यक्तीचा फोन बंद असल्यामुळे हे आरोपी हा गांज्या घेऊन परत निघाले होते. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
सदर दोन्ही आरोपी हे सखे भाऊ असून, या आधीसुद्धा ते अनेकदा असा गांज्या आणून विकत असल्याची माहिती पो निरीक्षक बाजीराव पोवार यांनी दिली. कारखान्यावरील हा गांज्या खरेदी करणारा व्यक्ती कोण याचा शोध आता पोलीस घेत आहेत. सदर आरोपींविरोधात अंमली पदार्थ विरोधी कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येणार असून, पुढील तपास सहायक पो निरीक्षक निलेश कांबळे हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.