कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर तालुक्यातील मेहेकरी येथील सुभाष अप्पा बडे (वय ४८) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून बुधवारी मध्यरात्री राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपवले. बडे यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे कुटुंबीय झोपेतून उठल्यानंतर लक्षात आला. 
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
याबाबत त्यांचे पुतणे शरद बडे यांनी सांगितले की, मयत सुभाष बडे यांना तीन मुली असून, दोन मुलींचे लग्न झालेली आहेत. मयत बडे यांनी खासगी सावकारासह बँक, खासगी संस्थांकडून कर्ज घेतले होते. मात्र, त्या कर्जाची वेळेत परतफेड झाली नाही. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीमधून काहीच उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे वेळेवर कर्ज फेडणे अशक्य झाले. या नैराश्यातून त्यांनी आपले जीवन संपवले असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे. नगर येथे शवविच्छेदन केल्यानंतर दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Blogger द्वारा समर्थित.