कारखानदार वजनकाटयात मारतात, साखर उताऱ्यात घोळ करतात !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेवगाव तालुक्यातील खानापूर येथे ऊस दराच्या आंदोलनादरम्यान झालेल्या गोळीबाराच्या घटनेचे पडसाद शेवगावात उमटले. या घटनेची माहिती मिळताच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येत शेवगाव बंदची हाक दिली व क्रांती चौकात निषेध सभा घेतली. या सभेदरम्यान तेथून पोलीस ठाण्यात येत असलेले श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांच्या वाहनावर आंदोलकांनी दगडफेक केली. यात त्यांच्या वाहनाची काचही फुटली. म्हणून पोलिसांनी लाठीमार केला.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
दरम्यान, या सर्व घटनानंतर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी तहसील कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अंबादास मोरे यांनी २५२५ रुपये दर देण्याचे जाहीर केल्यानंतर हे आंदोलन मागे घेत असल्याचे वस्त्रोदयोग महामंडळाचे माजी अध्यक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते - रविकांत तुपकर यांनी जाहीर केले.

झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी असून, मूळ प्रश्न सुटावा, ही सर्वांची अपेक्षा आहे. कारखानदार वजनकाटयात मारतात, साखर उताऱ्यात घोळ करतात. तसेच शासकीय अधिकारीही याबाबतीत बेफिकीर असल्याने शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याचीची वेळ आली आहे. याबाबत गंगामाई कारखाना व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करावा, गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तींच्या उपचाराचा खर्च गंगामाई कारखाना व शासनाने करावा, अशा मागण्या या वेळी कार्यकर्त्यांनी केल्या.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

बैठकीमध्ये झालेल्या चर्चेत नगरचे अप्पर पोलीस अधीक्षक घनशाम पाटील, श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्ष रोहिदास पवार, प्रादेशिक उपसंचालक (साखर ) राजकुमार पाटील, विशेष लेखा परिक्षक १ चे राजेंद्र निकम , प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसीलदार दीपक पाटील, वस्त्रोदयोग महामंडळाचे माजी अध्यक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते - रविकांत तुपकर, बाजार समितीचे सभापती संजय कोळगे, भाजपचे तालुकाध्यक्ष बापुसाहेब पाटेकर, जिल्हा सरचिटणीस अरुण मुंढे, जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे, कॉ.सुभाष लांडे, शिवशंकर राजळे, मनसेचे तालुकाप्रमुख गणेश रांधवणे, ज्ञानेश्वर कारखान्याचे सचिव काकासाहेब शिंदे, गंगामाई कारखान्याचे उपाध्यक्ष अंबादास मोरे यांनी सहभाग घेतला. 

या वेळी झालेल्या चर्चेत सरसकट २५२५ रुपये तर बैलगाडीने वाहतूक होणाऱ्या उसाला पहिला हप्ता म्हणून २५५० रुपये देण्याचे ठरले. वजनकाटा ॲनलाईन केलेला असून, याबाबत लवकरच शेतकऱ्यांना संदेश पाठवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत सरकार दरबारी प्रयत्न करण्याचे ठरले. या वेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन रवींद्र तुपकर यांनी केले.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.