प्रेमसंबंधातून राहुरीतील अंगणवाडी मदतनीस महिलेचा अत्याचार करुन खून.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरी तालुक्यातील गुहा येथील नंदा वाघमारे या अंगणवाडीमध्ये मदतनीस असलेल्या महिलेच्या डोक्यावर टणक वस्तूने वार करुन तिचा खून करण्यात आल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे. गुहा परिसरात एकाच आठवड्यात दुसरी खूनाची घटना घडल्याने या परिसरात मोठे दहशतीचे वातावरण पसरले आहे.हा खून प्रेमसंबंधातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. बुधवारी सायंकाळी याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
नंदा नामदेव वाघमारे (वय ४५) ही महिला बोरुडेनगर येथे एकटीच राहत होती. गुहा येथील वाबळे वस्ती येथे अंगणवाडीमध्ये मदतनीस म्हणून कार्यरत होती. सदरील प्रकार बुधवारी (दि. १५) सकाळी लक्षात आला असता स्थानिकांनी राहुरी पोलीस ठाण्यात कळवले.

राहुरी येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर क्षीरसागर व डॉ. राजेंद्र वैरागर यांनी वैद्यकीय तपासणी केली. यात महिलेच्या डोक्याला गंभीर मार लागलेला आढळून आला आहे. तसेच गुप्तांगात माती व खडे आढळून आले आहेत.बुधवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मयत महिला व संशयीत आरोपी यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर आरोपीने मयत महिलेच्या डोक्यात जोरदार वार करुन तसेच तिच्या शरीरात काठीसदृश वस्तू घालून ठार केले असावे, असे पोलिसांनी सांगितले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

गुहा परिसरात दोन-तीन दिवसांपूर्वी एक बारा ते तेरा वर्षाच्या मुलाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. त्या मुलाची अद्याप ओळख पटली नसून त्याच परिसरात दुसरा खून झाल्याने राहुरी पोलिसांसमोर तपासाचे एक आव्हानच उभे राहिले आहे. या घटनेबाबत सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. पुढील तपास उपनिरीक्षक लक्ष्मण भोसले हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.