तारकपूर रस्त्याच्या कामावरून आमदार जगताप आणि नगरसेवक गाडे यांच्यात 'श्रेयवाद'

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पत्रकार चौक ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंतच्या खराब रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केले आहे. आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी त्याची पाहणी केली. नगरसेवक योगीराज गाडे यांनी देखील या कामाची माहिती घेत पाहणी केले. राष्ट्रवादी व शिवसेनेचे समर्थक हे काम आमच्या पाठपुराव्यामुळेच सुरू झाल्याचा दावा करत आहेत. या कामाच्या श्रेयवादात राष्ट्रवादी आणि शिवसेना पुन्हा रंगली आहे. 




                         
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
रस्ता खराब झाल्याने रस्त्यावर नेहमीच अपघात होत आहेत. हा रस्ता खाली-वर झाला होता. अनेकांना अपघात होऊन जायबंदी झाले होते. निर्ढावलेले सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्याच्या दुरुस्तीकडे र्दुलक्ष करत होते. या रस्त्यावर जलवाहिनी देखील फुटली होती. त्यामुळे रस्त्यावर खड्डे अधिक पडले होते. जलवाहिनीचे कामही सुरू झाले असून, त्यानंतर डांबरीकरणाचे काम पूर्ण होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम सुरू करण्याचे आदेश सुप्रिम टोलवेज या ठेकेदाराला दिले आहेत.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

नागरिकांना दिलासा मिळणार - नगरसेवक योगीराज गाडे.
या रस्त्याच्या संदर्भात महापौर सुरेखा कदम आणि आपण स्वत: बांधकाम विभागाला पत्र दिले होते. वाहनचालकांची होत असलेल्या दैनाकडे लक्ष वेधले होते. काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा देखील इशारा होता. हे काम सुरू झाल्याने या रस्त्यावर होणारे अपघात टळणार आहेत. नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

नागरिकांच्या प्रश्नांवर काम करत राहू - आमदार संग्रामभैय्या जगताप.
पत्रकार चौक ते डिएसपी कार्यालयापर्यंत कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे. राष्ट्रवादीने या कामासाठी टोलनाका बंदचा इशारा दिला होता. कामाचे श्रेय कोणी घेत असेल, तर ती त्यांची जुनीच सवय आहे. नागरिकांच्या प्रश्नांवर काम करत राहू.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Blogger द्वारा समर्थित.