शेतक-यांचे आंदोलन हाताळण्यात प्रशासनाला अपयश आल्यामुळेच हिंसक वळण ! राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे शेतकऱ्यांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याची घटना अतिशय दुर्दैवी असून, या घटनेचा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
प्रशासनाला आंदोलन हाताळण्यात आलेल्या अपयशामुळेच आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याचा थेट आरोप करुन या घटनेची चौकशी करून दोषीवर तातडीने कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

शेवगाव येथील घटनेबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, राज्यातील शेतक-यांच्या कोणत्याही प्रश्नांवर शासन गंभीर नाही.कर्जमाफीच्या मुद्द्यावरून हे अधिक स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांचा सरकारच्या विरोधातील उद्रेक आता रस्त्यावर आला आहे. हे सरकारचे अपयश असल्याचे विखे पाटील म्हणाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.