आता मात्र हेच लोक खोट्या बैठक व खोट्या आश्वासनामध्ये उघडे पडले ! - सत्यजीत तांबे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :बहुचर्चित नगरच्या उड्डाणपूला संदर्भात आज विविध वर्तमान पत्रात छापून आलेल्या बातमी संदर्भात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
तांबे यांनी या पत्रकात म्हंटले आहे की ''मी सतत सांगत आलोय कि, भारतीय जनता पार्टी चे लोक नगरच्या उड्डाणपुलाच्या कामाचा खेळ खंडोबा करतायेत. कामाची कुठल्याही प्रकारची मंजुरी अद्याप अधिकृतरीत्या झालेली नसतांनाही फक्त त्या कामाचे श्रेय इतर कोणालाही मिळू नये व आम्हालाच मिळावं या स्वार्थी हेतूने ते सतत भूमिपूजनाची व कामाच्या बैठका घेतल्याचे नाटक करत असतात''. 

आमचा नितीन गडकरी साहेब यांच्यावर विश्वास
आमचा केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्यावर विश्वास आहे, त्यांनी कृपया या कामावर जातीने लक्ष घालावे व नगरचा उड्डाणपूल हा नगरकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा एवढीच एक माफक आमची अपेक्षा आहे व कृपा करून भूमिपूजनाचा कार्यक्रम न करता त्याचा सरळ लोकार्पणाचाच कार्यक्रम करावा हि नम्र विनंती .
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

आता मात्र हेच लोक खोट्या आश्वासनामध्ये उघडे पडले !
तसेच यासंदर्भात महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आमदार डॉ सुधीर तांबे यांनी लक्षवेधी सूचना मांडून सरकारचे लक्ष वेधले होते त्यावेळी हेच लोक लक्षवेधी सूचना मांडलीच नसल्याची म्हणत होते मात्र त्या लक्षवेधी सूचना मांडल्याचे आम्ही पुराव्यानिशी म्हणणे सादर केले होते, आता मात्र हेच सगळे लोक खोट्या बैठक व खोट्या आश्वासनामध्ये उघडे पडलेले आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.