राजकारणात मुस्लिम तरुणांना मानाचे स्थान देणार - राठोड.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिवसेना हा सर्व जातीधर्मातील लोकांना सामावून घेणारा पक्ष आहे. अल्पसंख्यांक समाजाला आम्ही नेहमीच न्याय मिळवून दिला आहे. शिवसेना मुस्लिमविरोधी असल्याचा अपप्रचार नेहमीच विरोधकांनी केला. मात्र, आम्ही मुस्लिम विरोधी नसून मुस्लिम धार्जिणे आहोत. आमच्याकडे सर्वधर्म समभाव आहे. जातीजातीत भांडणे लावण्याचे काम तुम्ही करायचे, त्याला तुम्ही प्रोत्साहन द्यायचे व काही झाले की शिवसेनेचे नाव घ्यायचे. मुस्लिम समाजाने नेहमीच शिवसेनेवर मनापासून प्रेम केले आहे. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
आशा टॉकीज व माणिक चौक परिसरातील मोठ्या संख्येने मुस्लिम तरुणांनी शिवसेनेत स्वखुशीने प्रवेश केला आहे. विरोधकांच्या कुटिल राजकारणाचा डाव ठरल्याने मुस्लिम समाज शिवसेनेपासून काहीसा दूर गेला होता. मात्र, हा समाज पुन्हा एकदा शिवसेनेकडे वळत आहे. राजकारणात मुस्लिम तरुणांना मानाचे स्थान देण्यात येईल, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले.

शिवसेना अल्पसंख्यांक आघाडीत सय्यद आवेज यांनी समर्थकांसह प्रवेश केल्यानंतर त्यांचे राठोड यांनी स्वागत केले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुते, अल्पसंख्यांकचे शहरप्रमुख सय्यद रियाज, संजय कोतकर, रमेश परतानी, डॉ. श्रीकांत चेमटे, संतोष गेनाप्पा, वसंत शिंदे, प्रमोद ठुबे, वाहीद शेख, ताबीज शेख, शानू शेख, इजान सय्यद, तौसीफ शेख, नवाज खान, तन्वीर शेख, खान इम्रान, सद्दाम सय्यद, अकीब सय्यद, शहानू शेख, आदिम शेख, ताहीर सय्यद, राजू जहागिरदार, शहेनवाज कुरेशी, शादाब शेख, सलमान शेख, सुलतान शेख, हंगला कुरेशी, शोएब शेख, फारूक शेख, साजीद शेख, साबीर शेख, मोहसीन शेख, अरफात जहागिरदार, मुज्जू बेग, मोहसीन बक्कर कसाव, अमित भोसले, दिनेश पारस, शाहरुख सय्यद, टिपू शेख, किशोर बांदल, सलमान कुरेशी, वाहीद कुरेशी, धनंजय वाघ, शरीफ सय्यद, इम्रान कुरेशी, बब्बू शेख, अरबाज शेख, फरहान शेख, रेहान शेख, शादाब तांबोळी, जैद पठाण आदी उपस्थित होते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

राठोड पुढे म्हणाले की, मुस्लिम समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेल्या परिसरात तरुणांची कमिटी स्थापन केली जाईल. त्या माध्यमातून तेथील प्रश्‍न सोडविले जातील. इतर पक्षांनी दिशाहीन केलेल्या मुस्लिम तरुणांना शिवसेना योग्य दिशेला घेऊन जाण्याचे काम करणार आहे. बाबा बंगाली परिसरात वाहून जाणाऱ्या पाण्याची मोठी समस्या असून, हा प्रश्‍न तातडीने सोडविला जाईल.

सय्यद रियाज म्हणाले की, सय्यद आवेज यांच्यासह सुमारे 200 ते 250 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून, आमची ताकद त्यामुळे वाढली आहे. सय्यद आवेज यांची पक्ष योग्य दखल घेईल. शहराच्या मध्यवर्ती भागातील हे तरुण आहेत. शिवसेना कधीही जातीपातीचे राजकारण करीत नाही. एकजुटीने शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत, असे सांगितले.

सय्यद आवेज यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी मी प्रेरित आहे. शिवसेनेची कार्यपद्धती सर्वसामान्यांना न्याय देणारी आहे. तरुणाला योग्य दिशा देणारी आहे. आजच्या युवा पिढीला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी शिवसेनेची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, असे ते म्हणाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.