जिल्हा बॅंकेतील नोकरभरतीस स्थगिती अन्यायकारक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जिल्हा सरकारी बॅंक नोकरभरतीस लागलेली स्थगिती अन्यायकारक असून या संदर्भात अमरण उपोषण करण्याचा इशारा नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या सुमारे तीस उमेदवारांनी जिल्हा उपनिबंधकांना निवेदनाद्वारे दिला आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंक यांच्या नोकरभरतीचा निकाल दि. २८ ऑक्टोंबर रोजी जाहीर झाला. त्यामध्ये आम्हा सर्वांची निवड झाली. आम्ही व आमच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांनी गुणवत्तेच्या जोरावर हे पद मिळवले. त्याचा पुरावा म्हणून आमच्याकडे उत्तरपत्रिकेची कार्बन प्रत देखील आहे.

३० ऑक्टोंबर रोजी भरतीवर सहा. निबंधक (नाशिक) यांच्याकडून स्थगिती आली. सदर भरती प्रक्रियेची चौकशी चालू आहे. वर्तमान पत्रातून ही भरती रद्द करून पुन्हा परीक्षा घ्यावी अशा मागणीच्या बातम्या येत आहेत. परंतु हे सर्व अयोग्य ठरेल.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

आम्ही गरीब कुटुंबातील विद्यार्थी अभ्यासाने, मेहनतीने व गुणवत्तेच्या जोरावर या परीक्षेत उत्तीर्ण झालो आहोत. परंतू कोणत्याही कारणास्तव जर भरती प्रक्रिया रद्द झाली किंवा पुन्हा परीक्षा झाली तर आमच्यासारख्या अनेक गुणवत्तेच्या जोरावर निवड झालेल्या उमेदवारावर सरळ सरळ अन्यायच ठरेल आणि आमच्या सारख्या गरजवंत विदद्यार्थ्यांचा हकनाक बळी जाईल. 

चौकशीत जर कुणी दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करून आम्हाला आमच्या नियुक्ती द्याव्या जर तसे घडले नाही तर आम्ही आमच्या हक्कासाठी अमरण उपोषणामार्फत लढा देवू असे शेवटी नमूद केले आहे. निवेदनावर सुमारे तीस उमेदवारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.