मंदिराच्या प्रांगणात अंडी फोडल्याने शेवगावमध्ये तणाव.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेवगाव शहरातील खंडोबानगर परिसरात असलेल्या संत भगवानबाबा व विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात अंडी फोडण्यात आल्याने तणाव निर्माण झाला आहे. हा प्रकार आज मंगळवारी (दि.१४) सायंकाळी ७ ते ८ वाजण्याच्या सुमारास घडला.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
एका सराफ व्यावसायिकाच्या मुलाचा आज वाढदिवस होता. त्या प्रीत्यर्थ त्याने लोकांसाठी पार्टीचे आयोजन केले होते. त्या पार्टीच्या वेळी काही तरुणांनी मंदिर परिसरात जाऊन अंडी फोडली. मंगळवारी कार्तिकी एकादशी होती. एकादशीनिमित्त या मंदिरात धार्मिक कार्यक्रम होत असतात, त्यासाठी काही भाविक मंदिरात गेले असता, हा प्रकार निदर्शनास आला व एकच खळबळ उडाली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

या प्रकारानंतर भगवानबाबांचे भक्त एकत्र आले. त्यांनी हा संपूर्ण परिसर पाण्याने स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर केदारेश्वरचे माजी संचालक राजेंद्र दौंड, ॲड. द्वारकानाथ बटुळे, प्रकाश दहिफळे, ॲड. संजय सानप व इतर कार्यकर्ते रितसर फिर्याद देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले. 

रात्री उशिरापर्यंत फिर्याद नोंदवण्याचे काम सुरू होते. दरम्यान, या घटनेतील आरोपींविरुद्ध कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल तसेच पोलिस ठाण्यावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा राजेंद्र दौंड यांनी दिला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.