श्रीगोंद्यात साडेपाच वर्षांच्या मुलाचे अपहरण .

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यातील भिंगाण येथील वैभव ऊर्फ बालू बापू पारखे या साडेपाच वर्षांच्या मुलाचे दि.१३ नोव्हेंबर रोजी सायं. ४ वाजण्याच्या सुमारास घरासमोर खेळत असताना अज्ञात इसमांनी अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत मुलाचे वडील बापू आबाजी पारखे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमांविरोधात अपहरणाचा गुन्हा दखल करण्यात आला आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
या अपहरणाच्या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील भिंगाण येथील बापू आबाजी पारखे (वय ५०) हे दि.१३ रोजी सकाळी आठ वाज़ण्याच्या सुमारास श्रीगोंदा येथे बाजारात आले होते. त्यांच्या पत्नी गुरे चारण्यासाठी शेतात गेल्या होत्या. 

या वेळी त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा वैभव ऊर्फ बालू हा दुपारी चार वाजता झोपेतून उठून घराबाहेर खेळण्यासाठी आला. सायंकाळी ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास घरासमोरील अंगणात खेळत असताना तो अचानक गायब झाला. घरातील मंडळींनी त्याची सर्वत्र शोधाशोध करूनही वैभव उर्फ बबलू सापडला नाही. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

यामुळे वैभवचे वडील बापू पारखे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात वैभवचे अपहरणाची तक्रार दखल केली आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे हे करत आहेत. याबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास त्यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.