पालकमंत्री राम शिंदेंसह खासदार दिलीप गांधींचा खोटारडेपणा उघड.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर येथील शिल्पा गार्डन ते स्टेट बँक चौक या पुणे-संभाजीनगर महामार्गावरील उड्डाणपुलासह जिल्ह्यातील रस्त्यांसाठी १० हजार कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय झाल्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यतेखाली झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आले होते. भाजप खासदार दिलीप गांधी यांनी त्याबाबतची घोषणाही केली होती. मात्र, येथील सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख यांनी माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागीतल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग कार्यासन मंत्रालयाने अशा कोणत्याही बैठकीचे आयोजनच केले नसल्याचे लेखी सांगितले आहे. यामुळे श्रेयवादाच्या नादात भाजपचे मंत्री, खासदारांचा खोटारडेपणा उघड झाला आहे.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
नगर शहरातील उड्डाणपूल आठ वर्षांपासून कागदावरच आहे. तत्कालीन पालकमंत्र्यांसह पदाधिकाऱ्यांनी अनेकदा बैठका घेऊन या उड्डाणपुलाचा विषय मार्गी लावण्याचे प्रयत्न केला होता. मात्र, प्रत्यक्षात हा पूल कागदावरून पुढे सरकलाच नाही. त्यामुळे आठ वर्षांपूर्वी १८ कोटी खर्च असलेल्या या उड्डाणपुलाचा खर्च सध्या १५० कोटींच्या पुढे गेला आहे.

चेतक एंटरप्रायजेस या खासगी कंपनीला या पुलाचा ठेका देण्यात आला होता. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लावादापुढे वाद सुरू असल्याने याबाबतचा अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी मुंबईत नगरच्या उड्डाणपुलाबाबत बैठक झाल्याचे सांगण्यात आले होते. या बैठकीत उड्डाणपुलासह जिह्यातून जाणारे महामार्ग आणि राज्यमार्गांसाठी १० हजार कोटी रुपये मंजूर झाल्याचे सांगण्यात आले होते. याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत महामार्ग कार्यासन मंत्रालयाकडे या बैठकीचे वृत्त देण्याची मागणी केली आहे.

१९ सप्टेंबर रोजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यतेखाली बांधकाम खात्याचे वरिष्ठ अधिकारी व केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाचे ओएसडी व खासदार दिलीप गांधी व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक होऊन उड्डाणपुलाकरता ३२५कोटी खर्च उभारण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली होती. माहितीच्या अधिकारामध्ये मंत्री प्रा. शिंदे यांच्या मंत्रायालयात ५ सप्टेंबर २०१७ रोजी इतिवृत्त मागविले असता, सदर मंत्रालयाचे कार्यासन अधिकारी अभय देशमुख यांनी तो अर्ज सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून माहिती देण्यास सूचित केले होते. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

सार्वजनिक बांधकाम खात्याचे कक्ष अधिकारी रा. व्यं. कुलकर्णी यांनी जलसंधारण मंत्रालयाला पत्र देऊन ६ नोव्हेंबर २०१७ रोजी पत्र देऊन मृद व जलसंधारणमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम विभागाने बैठक आयोजित केलेली नव्हती, तशा सूचना या कार्यालयास प्राप्त नव्हत्या, असे उत्तर दिलेले आहे. त्यामुळे नगर शहरातील उड्डाणपुलाबाबत झालेली बैठक कायदेशीर की बेकायदेशीर, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबत शेख यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, उड्डाणपुलाचा प्रश्न लवादासमोर प्रलंबित आहे. अद्यापि त्याचा निर्णय झालेला नसताना राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने उड्डाणपुलासह रस्त्यांसाठी दहा हजार कोटी मंजूर केल्याची घोषणा खासदार गांधी यांनी केली आहे. त्यामुळे खासदार गांधी म्हणतात ते खरे, की राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने दिलेले उत्तर खरे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दरम्यान, उड्डाणपुलाचे श्रेय घेण्यासाठी भाजपमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे व खासदार दिलीप गांधी यांच्यातही विसंगती सातत्याने पुढे आली असतानाच आता बैठकच झाली नसल्याचे उघड झाल्याने भाजपच्या नेत्यांचा खोटारडेपणा उघड झाला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.