महापौरांचा प्रभागच विकासापासून दूर, तर शहर कधी सुधारणार ?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महापौरांचा प्रभाग परिसर माळीवाड्यातील मी रहिवाशी आहे. या प्रभागातील दैना कशी आणि कोणामुळे आहे हे सांगायला नको. प्रभागात रस्ते नीट नाहीत. मुलभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. महापौरांचा प्रभागच विकासापासून वंचित आहे, तर शहराचा विकास कधी होणार', असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते यांनी महापौर सुरेखा कदम यांच्यावर निशाणा साधला.राष्ट्रवादीचे नगरसेवक कुमार वाकळे यांच्या प्रभागातील रस्त्यांच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त करण्याबरोबर महापौरांच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्नचिन्ह त्यांनी उपस्थित केले. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
गणराज कॉलनी, सागर रो-हौसिंग व सप्तश्रृंगी माता परिसर येथे राष्ट्रवादी व युवक काँग्रेसच्या तीन शाखांचे उद.घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार संग्रामभैय्या जगताप, शाखाध्यक्ष रूपेश कावळे, हेमंत मुरकुटे, संजय पाटील, शशिकांत कातोरे, शैलेश पांढरे, संजय कातोरे, अनिल मांढरे, विशाल शिंदे, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, दत्ताभाऊ वाकळे, ज्ञानदेव काकडे, अण्णा इथापे, दादा दरेकर, गजेंद्र भांडवलकर, साधना बोरुडे, योगेश नेमाणे, अमित खामकर, साहेबान जहागिरदार, मयूर कुलथे, जॉय लोखंडे उपस्थित होते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
विधाते म्हणाले, 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विकासाचे राजकारण शिकविल्यामुळे नगर शहराचे आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे राजकारण सुरू आहे.' समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकासकामे पोहोचवण्याचे काम राष्ट्रवादी करीत आहे, असे ते म्हणाले.

नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी पक्ष शाखेच्या माध्यमातून तरुणांनी समाजातील प्रश्­न सोडण्याचे आवाहन केले. बोर्डावर नाव झळकण्यापुरते न राहता विकासकामांच्या माध्यमातून तरुणांनी राजकारणात प्रवेश करावा, असे त्यांनी आवाहन केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.