लोकप्रतिनिधी आपले स्वहित पाहण्याचा प्रयत्न करतात - गडाख.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी 'अपना विकास' साधण्यासाठी तालुक्यातील एका मोठ्या उद्योगपती बरोबर भागीदारी केली आहे. त्यातून त्यांची गंगा वाहत आहे. परंतु, आमची भागीदारी ही शेतकरी, कष्टकरी, हमाल मापडी यांच्यासह तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या हिताबरोबर असल्याचे माजी आमदार शंकरराव गडाख यांनी घोडेगाव कृषी उत्पादन कमिटी येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात बोलतांना सांगितले.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
अध्यक्षस्थानी बाजार समितीचे अध्यक्ष कडुबाळ कर्डिले होते. गडाख म्हणाले, ही शेतकऱ्यांची बाजार समिती बंद पडावी व चांगल्या प्रकारे चाललेल्या कामात लोकप्रतिनिधी विविध अडथळे आणून खोटी खटले व अपप्रचार करीत आहेत. शेतकऱ्यांना अल्प दारात भोजन देणारी नेवासा बाजार समिती ही जिल्ह्यातील एकमेव समिती आहे. घोडेगाव येथे कांदा मार्केट चालू केले. त्यावेळेस प्रतिसाद नव्हता. विविध अडचणी येत होत्या. हे मार्केट चालेल की नाही, ही अनेकांना शंका होती. परंतु, तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपण अडचणी सोडविल्या. आज राज्यातील एक नामवंत कांदा मार्केट घोडेगाव येथे चालत आहे.

त्या' मार्केटला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद नाही.
घोडेगाव येथील शेतकऱ्यांचे कांदा मार्केट बंद करून लोकप्रतिनिधींना एका उद्योगपतीबरोबर भागीदारीत खासगी कांदा मार्केट चालू करायचे आहे. त्यासाठी व्यापाऱ्यांना गळ घातली गेली. परंतु, व्यापाऱ्यांनी हा डाव हाणून पाडला. एकाही व्यापाऱ्याने यांना प्रतिसाद दिला नाही. शासन स्तरावर शेतकरी, आडतदार, हमाल मापाडी यांचे विविध प्रश्न आहे. पण या समस्या सोडविण्याऐवजी लोकप्रतिनिधी आपले स्वहित पाहण्याचा प्रयत्न करतात, ही लाजिरवाणी बाब आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
या कार्यक्रमास अशोक मंडलिक, बाळासाहेब सोनवणे, भाऊराव बऱ्हाटे, अशोक नाना येळवंडे, दीपक जाधव, अशोक विधाटे, डॉ. भाकड, संतोष सोनवणे, भास्कर सोनवणे, अरुणकाका जाधव यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. रामदास सोनवणे यांनी आभार मानले

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.