रस्तालूट करणारे दोघे आरोपी जेरबंद.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :रस्ता लूटसह अन्य गुन्ह्यात आरोपी असलेल्या दोघा आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले. जिल्हा पोलिसप्रमुख रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीची पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
आदि उर्फ आदीनाथ लक्ष्मण कर्डिले (वय २५, रा.वडझिरे) व पप्पी उर्फ मनीषा अशोक सांगळे (वय २९, रा.शहांजापूर, पारनेर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींना सुपा एमआयडीसी येथे सापळा रचून मोठ्या शिताफीने पकडण्यात आले.

रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता कोणता ? अशी विचारणा फिर्यादीने आरोपींकडे केली होती. त्याचा फायदा उचलत आरोपींनी फिर्यादीला रेल्वे ब्रिजखाली नेवून मारहाण केली. त्याचप्रमाणे फिर्यादीकडील रोख रक्कम व मोबाईल असा ऐवज चोरुन नेला. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरच्या गुन्ह्यातील आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून इतर गुन्हे उघडकीस येतील, असा कयास पोलिसांनी वर्तवला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.