समाज केवळ सुशिक्षित नव्हे ,तर सुसंस्कारित होण्याची गरज :वहाडणे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिक्षण वाढले, सर्वसामान्यांचा आर्थिकस्तर उंचावला तरी समाजात दुरावस्था आहे. याचे कारण समाज केवळ सुशिक्षित नव्हे तर सुसंस्कारित होण्याची गरज आहे. इंटरनेट, मोबाईलच्या युगात आपण लिहिणे, वाचणे विसरलो. त्यामुळे विनोदी लघुकथा लेखन स्पर्धेची गरज भासते असे प्रतिपादन कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले. 

                                                       

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
अहमदनगर जिल्हा वाचनालय आयोजित पद्माकर डावरे स्मृती मराठी विनोदी लघुकथा लेखनास्पर्धेचे पोरितोशिक वितरण श्री. वहाडणे यांच्या हस्ते वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात झाले. व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष शिरीष मोडक, उपाध्यक्षा शिल्पा रसाळ जोशी, अजित रेखी, प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड, सहकार्यवाह उदय काळे, संचालक दिलीप पांढरे, स्पर्धेचे प्रायोजक व उद्योजक रवींद्र डावरे उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार सतीश काणे उपस्थित होते.

प्रास्ताविकात प्रा. मोडक यांनी वाचनालयाच्या उपक्रमांची माहिती दिली. उपाध्यक्षा शिल्पा रसाळ यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. प्रमुख कार्यवाह विक्रम राठेाड यांनी स्वागत केले. श्री. रविंद्र डावरे यांनी वाचनालयाला दिलेल्या २५ हजार रुपये देणगीतून सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. श्री. डावरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वाचनालयाच्या संचालिका प्रा. ज्योती कुलकर्णी, निमंत्रित सदस्य गणेश अष्टेकर, उपग्रंथपाल अमोल इथापे, अकौंटंट नितीन भारताल, ओंकार बडगू, पल्लवी कुक्कडवाल, ज्ञानेश्वरी बागडे, विठ्ठलराव शहापूरकर उपस्थित होते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
पद्माकर डावरे स्मृती मराठी विनोदी लघुकथा लेखन स्पर्धेचा निकाल प्रथम क्र. रु. २१०० सुधीर मुळे, द्वितीय क्र. रु. १५०० भाचंद्र बालटे, तृतीय क्रमाक रु. ७५० यशवंत आंबेकर, उत्तेजनार्थ ३०० वंदनाताई शिवलकर, सुनंदाताई धर्माधिकारी. स्पर्धेचे परीक्षक म्हणून अनंत दसरे व सदानंद भणगे यांनी काम पाहिले. यावेळी सौ. सुरेखा डावरे, वसंतराव विटणकर, विनायक पवळे, मंदाताई मुळे, ॲड. अच्युतराव चौधरी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.