फसव्या जाहिरातींवर खर्च करण्यापेक्षा दुधाला भाव द्या - आ. थोरात.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सध्या खासगी दुध संघ दुधाला कमी भाव देत असून सहकारी संघ मात्र नियमाप्रमाणे भाव देत आहे. यामुळे दोन्ही संघांच्या विक्रीत मोठी तफावत होत आहे. भाजप सरकारने फसव्या जाहिरातींवर खर्च करण्यापेक्षा अतिरिक्त दुधावर पर्याय म्हणून शासनाने प्रतिलिटर दुधाला किमान ५ ते ७ रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
अमृतवाहिनी शिक्षण संस्थेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतदादा पाटील यांच्या जयंती शताब्दी निमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम संपल्यानंतर आ. थोरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, दुध व्यवसायाने ग्रामीण भागातील कौटुंबिक व अर्थव्यवस्था मजबूत केली आहे. या दुध व्यवसायाला सरकारने पालकत्वाची भूमिका घेत मदतच केली पाहिजे. 

सध्या राज्यात दुधाचे उत्पादन वाढले आहे. अशा वेळी सध्या खाजगी दुध संघ मनमानीपणे १८ ते १९ रुपये भाव देत आहे. मात्र सहकारी दुध संघ शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे भाव देतो. कमी भावामुळे खाजगी लोक कमी भावातच दुध विक्री करतात. त्यामुळे सहकारी दुध संघांच्या दुधाची विक्री कमी होते. यामुळे सहकारी दुध संघांची परिस्थिती अडचणीची झाली आहे. अशी स्थिती राहिल्यास सर्व सहकारी दुध संस्था मोडकळीस येतील. त्यांना जाणीवपुर्वक मदत करताना शासनाने प्रतिलिटर ५ ते ७ रुपये अनुदान दिले पाहिजे..
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
आघाडी सरकारच्या काळात सरकारने दुध उत्पादकांना मदत केली होती. आज शेतकऱ्यांचे अनेक प्रश्­न प्रलंबित आहे. भाजपा सरकारने कर्जमाफीची जाहिरात मोठी केली. परंतु अजून कुणाला ही कर्जमाफी मिळाली नाही. फक्त मी लाभार्थीच्या फसव्या जाहिराती सुरु आहे. 

अनेक उद्योगपती, कारखानदार यांना ही सरकारने लाभ दिला. त्यांच्या पोटाला का लाभार्थीच्या पाट्या चिटकवल्या नाहीत ? गरिब शेतकऱ्याला काहीही लाभ न देता मात्र त्यांच्या पोटाला लाभार्थीची पाटी चिटकवून जाहिरात करणे अत्यंत खेदजनक आहे. कोणताही अभ्यास न करता सरकार फक्त लोकप्रिय घोषणा करत आहेत. फक्त फसव्या जाहिराती बंद करून थांबलेला विकास सुरु करत शेतकऱ्यांना मदत करावी, असे आवाहन आ. थोरात यांनी केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.