डॉ. सुजय विखेंच्या उमेदवारीने भाजपला काही फरक पडणार नाही - प्रा. शिंदे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कॉंग्रेसचे युवा नेते डॉ. सुजय विखे नगर लोकसभा मतदार संघातून लढणार असल्याचे सुतोवाच विखे यांनी केले आहे. त्याचा भाजपच्या उमेदवाराला काही फरक पडेल का ? यावर प्रा. शिंदे यांनी जनताच काय ते ठरविणार असल्याचे सांगितले. 


अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .

डॉ. सुजय विखेंच्या उमेदवारीने भाजपला काही फरक पडणार नाही
दैनिक सकाळ कार्यालयात आज प्रा. शिंदे यांच्याशी चर्चा करताना त्यांनी महत्त्वाच्या राजकीय विषयांना स्पर्श केला.कुणीही कोणत्याही मतदारसंघातून इच्छा व्यक्त करू शकतो. तसा त्यांचा अधिकार आहे. तो ज्याचा-त्याचा प्रश्‍न आहे. आता लोक ठरविणार की कोणत्या पक्षाचा खासदार करायचे. त्यामुळे कुणीही उमेदवारी केली, तरी भाजपला त्याचा काही फरक पडणार नाही, असे ते म्हणाले. 
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
अजीतदादा कर्जत-जामखेडमधून लढणार ही केवळ अफवा...
जामखेड मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला बनला आहे. मध्यंतरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार राशीनमध्ये आले असता ते आगामी काळात याच मतदारसंघातून विधानसभा लढविणार, अशी चर्चा सुरू झाली होती. एव्हढेच नव्हे, तर त्यांनी अंबालिका साखर कारखान्याच्या माध्यमातून कर्जत परिसरात संपर्क मोहीम राबविल्याचे चर्चिले जात होते. जर ते या मतदारसंघातून उभे राहिल्यास प्रा. शिंदे यांना विरोधक असतील. याबाबत प्रा. राम शिंदे यांनी मत व्यक्त करताना ही केवळ अफवा असल्याचे सांगितले. "" कुणीतरी एकाने ही बातमी व्हायरल केली आहे. ती सार्वजनिक नाही. त्यामुळे त्यात तथ्य नाही, असे प्रा. शिंदे म्हणाले.

                                              -------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.