सामाजिक ऐक्य परिषदेत एकतेचा संदेश देवून, जातीयवादी शक्ती विरोधात वैचारिक एल्गार

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :गुलाम बनविण्यासाठी माणसावर जातीय व्यवस्था लादण्यात आली. या विरोधात जागृती निर्माण झाल्यास हिंदू मुस्लिमांना लढविण्यात आले. भारताचा बहुजन समाज हिंदू नाही. बहुजन समाजाकडून चुक झाली की, त्यांनी स्वत:ला हिंदू समजले. हिंदू नावाचा धर्म असतित्वात नाही. देशात अंधकार पसरलाय व्यवस्था परिवर्तनाचा सुर्योदय होण्याच्या वाटेवर असल्याचे प्रतिपादन ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ते मौलाना खलीलुरहमान सज्जाद नौमानी यांनी केले. अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .

सावित्री-फातेमा विचार मंचच्या वतीने नगरच्या क्लेरा ब्रुस मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक ऐक्य परिषदेच्या अध्यक्षीय भाषणात मौलाना नौमानी बोलत होते. यावेळी माजी न्यायमुर्ती बी.जी. कोळसे पाटील, जमाअते इस्लामी हिंदचे तौफिक अस्लम खान, मराठा सेवा संघाचे गंगाधर बनबरे, इंजी. विजयकुमार ठुबे, बामसेफचे कुमार काळे, लिंगायत समाजाचे शिवानंद हैबतपुरे, अ.भा. माळी महासंघाचे शंकरराव लिंगे, रामदास महाराज जाधव, सत्यपाल महाराज शिरसोलीकर, कॉ.स्मिता पानसरे, अशोक गुंजाळ, बहिरनाथ वाकळे, अभिजीत वाघ, मौलाना अन्वर नदवी आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

व्यवस्था बदलल्या शिवाय परिवर्तन अशक्य 
मौलाना नौमानी पुढे म्हणाले की, मनुष्य समानतेवर विश्‍वास ठेवत नाही. ही व्यवस्था भारतीय नसून बाहेरुन आलेली ही व्यवस्था आहे. देशात शोषित वर्गाला एकत्र करण्याचे काम ही परिषद करत आहे. यामुळे जागृकता येत आहे. सरकार बदलून परिवर्तन होणार नाही. यासाठी व्यवस्था बदलण्याची गरज आहे. व्यवस्था बदलल्या शिवाय परिवर्तन अशक्य आहे. जो मुस्लिम नाही ते सर्व हिंदू हा मुस्लिम समाजाचा भ्रम झाला. शोषित वर्गाशी भाईचारा वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले.

शांती व भाईचारेसाठी परिषदेच्या माध्यमातून प्रचार व प्रसार
प्रारंभी सत्यपाल महाराज शिरसोलीकर यांचे समाज प्रबोधनावर प्रवचन झाले. त्यांनी विविध विषयावर हात घालत विनोदी शैलीतून प्रवचन केले. अध्यक्षीय सुचना खलीलोद्दीन रहेमान नदवी यांनी मांडली. प्रास्ताविकात हाफिज सय्यद अजीज मोहीद्दीन यांनी जाती, धर्म व पंथाच्या नावाखाली भारतात अत्याचार चालू आहे. जातीय द्वेष पसरवून एकमेकांना लढवले जात आहे. समाजात जातीय द्वेषने पसरलेली तिरस्काराच्या भिंती तोडून समाजाला जोडण्याचे काम ऐक्य परिषदेच्या माध्यमातून केले जात आहे. सामाजिक एकतेमध्ये भारताचा विकास असून, शांती व भाईचारेसाठी या परिषदेच्या माध्यमातून प्रचार व प्रसार चालू असून, कोल्हापुर नंतर नगरमध्ये ही दुसरी परिषद होत असल्याचे त्यांनी सांगितले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
बहुजन समाज एकत्र आल्यास व्यवस्थेला हादरा बसतो
लिंगायत समाजाचे शिवानंद हैबतपुरे म्हणाले की, भारतात जाती, धर्माच्या उतरंडी संपतील तेंव्हाच खर्या अर्थाने समाजनिर्मिती होणार आहे. जाती पंथानी देश विखुरला गेला. देशातील जातीय व्यवस्था हे मनुवादी व्यवस्था आहे. मनुवादी व्यवस्थेचा उद्रेकातून दाभोळकर, पानसरे, कुलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या. बहुजन समाज एकत्र आल्यास व्यवस्थेला हादरा बसतो. कारण एकत्र आल्यावर विचार मंथन होवून क्रांती होत असल्याचे त्यांनी सांगितले.

जातीमध्ये भांडणे लावण्याचे कारस्थान सध्या चालू 
शंकरराव लिंगे म्हणाले की, महात्मा फुलेंनी घर सोडल्यावर त्यांना ईस्माइल शेख या मुस्लिम बांधवाने आश्रय दिला. जातीमध्ये भांडणे लावण्याचे कारस्थान सध्या चालू आहे. डॉ.बाबासाहेबांनी संविधानात दिलेल्या कलम 340 नुसार बहुजनांना हक्क मिळाल्यास सर्व तंटे मिटू शकणार असल्याची अपेक्षा व्यक्त करुन, महात्मा फुले यांचे स्मारक मुंबईमध्ये होण्यासाठी व त्यांना विश्‍वरत्न पुरस्कार मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली.

मोदी सत्तेचा वापर हिंदुत्वाच्या प्रचार व प्रसारासाठी करत आहेत.
कॉ.स्मिता पानसरे म्हणाल्या, धार्मिक उन्मादी वातावरण थोपविण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप इतर संघटनांना पुढे करुन, देशात जातीयवाद पसरवित आहे. पंतप्रधान मोदी सत्तेचा वापर हिंदुत्वाच्या प्रचार व प्रसारासाठी करत आहे. सोशल मिडियाद्वारे हिंदुत्ववादी प्रचारासाठी व समाजात दहशत माजविण्यासाठी झुंडी निर्माण केल्या जात आहे. शत्रुंशी लढा देण्यासाठी त्यामागचा राजकारण जाणून घेणे आवश्यक आहे. मोदींच्या अध्यक्षतेखाली देशात अघोषित आणिबाणी लागू आहे. लव जिहाद, घर वापसी, गो हत्या बंदी या विषयावर समाजात द्वेष पसरविण्याचे काम चालू आहे. मन की बात करणारे मोदी मनासारखे वागत नाही. त्यांचा रिमोट आरएसएस च्या हातात असल्याचा अरोप त्यांनी केला.

राजकारणात देव, धर्म आनू नये.
बी.जी. कोळसे पाटील म्हणाले की, संविधानाची अंमलबजावणी न करण्याची शपथ राजकारण्यांनी घेतली आहे. देशात स्वातंत्र्य विचाराचे तरुण निर्माण झाले पाहिजे. विषारी विचारसरणीचा आदर्श भाजपपुढे आहे. मोदी यांची लोकप्रियता मॅनेज केलेली असून, सर्वात जास्त खुन करणारा पंतप्रधान ही त्यांची खरी ओळख आहे. गुजरात दंगल त्यांनी घडविली. राजकारणात देव, धर्म आनू नये. ही वैचारिक पातळीवरची लढाई आहे. या विषारी विचारसरणीला छेद देण्यासाठी बंधुभावाचा संदेश या ऐक्य परिषदेच्या माध्यमातून दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
देशात गरिबी व श्रीमंती यामध्ये मोठी दरी वाढली 
इंजी. विजयकुमार ठुबे यांनी झोपलेल्याला जाग करण्याचे काम या परिषदेच्या वतीने केले जाणार असल्याचे सांगितले. कॉ.बहिरनाथ वाकळे यांनी चांगल्या व्यक्ती बरोबर चालण्याचा संदेश दिला. तौफिक अस्लम खान यांनी संविधानाने सर्वांना समान हक्क दिला असून, त्याची मुल्ये समजण्याची गरज आहे. ईस्लाम धर्मात एकता व समानतेचा संदेश देण्यात आला आहे. देशात गरिबी व श्रीमंती यामध्ये मोठी दरी वाढली आहे. जगातील चांगल्या संविधानापैकी भारताचा संविधान आहे. समाजात समानता आनण्यासाठी हत्यारानी नव्हे तर विचाराने संघर्ष करावा लागणार असल्याचे ते म्हणाले.

संत होवू नका मनुष्य व्हा
रामदास महाराज जाधव यांनी आपल्या उपरोधक शैलीने बाबागिरी, घरातील कटकटीवर भाष्य करत परिषदेत हशा पिकवली. शुत्रचा नांव घेता घेता त्याच्या प्रचाराने तो सत्तेवर आला असल्याचे सांगत, संत होवू नका मनुष्य व्हा व मनुष्य म्हणून जगण्याचा त्यांनी संदेश दिला.

देशामध्ये शोषित कोण? हे ओळखण्याची गरज आहे
बामसेफचे कुमार काळे यांनी जातीयवादावर भाजपसह काँग्रेसवर तोफ डांगली. इसिसच्या नावाखाली मिस्लिम युवकांना गोवण्यात आले. देशामध्ये शोषित कोण? हे ओळखण्याची गरज आहे. तसेच ओबीसी, आदिवासी हिंदू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या परिषदेसाठी मुस्लिम समाजासह बहुजन समाजातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ.रफिक सय्यद यांनी केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.