सरकारच्या कामावर शिवसेना समाधानी नाही -नीलम गोऱ्हे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :विविध प्रश्नांमुळे राज्यातील सर्वसामान्य जनता अस्वस्थ आहे़ नोटाबंदीचा मूळ उद्देश सफल झालेला नाही़ महागाई वाढत आहे़ त्यामुळे सरकारच्या कामकाजाबाबत शिवसेना पूर्णत: समाधानी नाही़ असे मत शिवसेनेच्या उपनेत्या आमदार निलम गोऱ्हे यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
गोऱ्हे म्हणाल्या राज्यात १९९५ साली सेना-भाजपाचे सरकार होते़ आज मात्र परिस्थती तशी नाही़. निवडणुकीत सेना-भाजपा स्वतंत्र लढले़ सरकारमध्ये सहभागी असलो तरी जनतेच्या प्रश्न सोडविण्यासाठी ठाम भूमिका घेतली जाते़ सेना सरकारमधून बाहेर पडली तर शिवसेनेचे आमदार फुटतील असा राजकीय संभ्रम विरोधकांकडून निर्माण केला जात आहे़ सेनेतून बाहेर गेलेले पुन्हा सेनेत आले़ ते बाहेर राहिले ते एकटे पडले़

पुढे त्या म्हणाल्या की गेल्या १७ वर्षांत नगर जिल्ह्यात कोठेवाडी ते कोपर्डी या प्रकारणाच्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत़ अशा घटनांनंतर आरोपी पकडले जातात़ त्यांच्या शिक्षा होते़ मात्र आरोपीला वरिष्ठ न्यायालयात जाण्याची संधी असल्याने त्यामुळे शिक्षेला विलंब होतो़ त्यामुळे अशा अत्याचाराच्या घटनांसाठी जलदगती न्यायालयाची निर्मिती करणे गरजेचे असून, याबाबत विधानपरिषदेत आवाज उठविणार आहे़.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
शासकीय सेवे कार्यरत असलेल्या महिलांबाबत अत्याचार अथवा हिंसक घटना घडली़ तर त्यांना शासकीय सुविधा देणे गरजेचे असून, याबाबतही पाठपुरावा करणार आहे़ बालन्यायालयात मुलांना भितीदायक वातावरण निर्माण होऊ नये यासाठी तेथील अंतर्गत रचना बदलणे गरजेचे आहे़ राज्यात २०१४ पूर्वी गुन्हेगारी घटनांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाणे अवघे साडेतीनटक्के होते़ सध्या मात्र हे प्रमाण ५७ टक्के आहे़ पोलीसांनी संवेदनशीलपणे काम केले तर सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल़ पीडित महिलांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून नयेत़ असे आव्हान त्यांनी केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.