लष्कराला टिचभरही जमीन घेऊ देणार नाही आमदार विजय औटी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर, राहुरी आणि पारनेर तालुक्यातील २५ हजार हेक्टर जमीन लष्काराला देण्याच्या हालचाली सुरू आहे. या प्रक्रियेला तिन्ही तालुक्यातून विरोध असून, टिचभर देखील जमीन कोणालाही घेऊ देणार नाही,' असा इशारा आमदार विजय औटी यांनी दिला आहे. जिल्हा प्रशासन याबाबत तोंडी आदेश देऊन कारवाई राबत आहे. त्याचा जाब देखील आज (सोमवारी) जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
माजी खासदार दादापाटील शेळके यांनी तिन्ही तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्यांनी या प्रश्नांवर बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत घेऊन याविरुद्ध जनलढा उभारणार असल्याचे सांगितले. आमदार विजय औटी, जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव गाडे, सदस्य काशिनाथ दाते, सदस्य प्रताप शेळके, पारनेर पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे आणि शेतकरी उपस्थित होते.

दादापाटील शेळके म्हणाले, 'नगर जिल्ह्यातील यापूर्वी ४० हजार हेक्टर शेतजमीन लष्काराला फायरिंगसाठी देण्यात आली आहे. देशाच्या लष्काराकडे पुर्नवसनाचा कायदा नाही. यामुळे १९५६ रोजी शेकडो एकर जमीन लष्काराने घेतली. यामुळे या भागातील बागायतदार आज रोजंदारीने काम करत आहेत. ही परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे.' नगर, राहुरी आणि पारनेर तालुक्यातील जनता आणि लोकप्रतिनिधींनी एकजुटीने येणाऱ्या परिस्थितीविरुद्ध लढा उभारण्याचे आवाहन करत एकट्या नगर जिल्ह्याने संरक्षण खात्याला जमीन देण्याची मक्ता घेतला आहे की काय? असा संतप्त सवाल दादापाटील शेळके यांनी यावेळी उपस्थित केला.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
औटी म्हणाले, 'या तीन तालुक्यातील २५ हजार एकर जमीन लष्काराने अधिगृहीत केल्यास नगर शहर आणि मुळा धरणाचे क्षेत्र उध्दवस्त होईल. राज्यात २ लाख ५० हजार पडिक जमीन आहे. ही जमीन राज्य सरकारच्या मालकीची असून सरकारने खुशाल ती लष्काराला द्यावी.' लष्कारात पुर्नवसनाचा कायदा नसल्याने प्रस्थापित शेतकऱ्यांना कशासाठी विस्थापित कराचे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

या तीन तालुक्यातील जनतेने सर्व ताकदपणाला लावून लष्काराचा डाव हाणून पाडावा. या तिन्ही तालुक्यातील टिचभर जमीन देखील कोणालाही घेऊ देणार नाही, असे सांगत खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजीराव कर्डिले हे देखील यासाठी पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मंत्री चंद्रशेखर बावन्नकुळे यांच्यासोबत चर्चा झाली असून त्यांनी लष्काराचे अधिकारी आणि महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंुंबईला बैठक लावणार असल्याचे आश्­वासन त्यांनी दिले आहे. वेळप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून दिल्लीपर्यंत लढा देण्याचा निर्धार यावेळी औटी यांनी व्यक्त केला.

महसूल अधिकाऱ्यांना जाब विचारणार.
निवासी उपजिल्हाधिकारी यांनी तलाठ्यांना जमिनीच्या विविध क्षेत्राविषयी माहिती संकलित करण्याचे तोंडी आदेश दिले आहे. हे आदेश कोणत्या अधिकाराने दिले याचा जाब आपण विचारणार असल्याचे आमदार विजय औटी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आमदार औटी यांच्यासह प्रमुख पाच जणांचे शिष्टमंडळ आज (सोमवारी) जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी येणार असल्याने या बैठकीकडे आता लक्ष लागले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.