शहीद जवानाच्या पुतळ्याचा तपासाच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे आत्मक्लेश आंदोलन.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पारनेर तालुक्यातील वडनेर हवेली येथील शहीद जवान अरुण बबन कुटे यांच्या चोरीस गेलेल्या पुतळयाचा पोलिसांनी त्वरित तपास लावावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी रविवार, दि. १२ रोजी सकाळी वडनेर येथील फाटयावर मौन व आत्मक्लेश आंदोलन केले. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
याबाबतची माहिती अशी की, शहीद जवान अरुण बबन कुटे यांना पुंछ राजोरी (जम्मू -काश्मी) येथे अतिरेकी हल्ल्यात वीरमरण आले होते. त्यांनी देशासाठी अतिरेक्यांचा खात्मा करून स्वत:चे बालिदान दिले. यामुळे कुटे परिवार व वडनेर हवेली ग्रामस्थांच्या वतीने सहा महिन्यांपूर्वी पारनेर - विसापूर रस्त्यावरील वडनेर हवेली फाटयावर कुटे यांचे स्मारक उभारून त्यामध्ये ६० किलो वजनाच्या पंचधातूच्या पुतळयाची उभारणी केली होती. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
परंतु हा पुतळा सहा महिन्यांपूर्वी चोरटयांनी चोरून नेला. याबाबत सुपा पोलिस स्टेशनला फिर्यादही नोंदविण्यात आली होती; परंतु अद्याप चोरीचा तपास लागला नाही. यामुळे माहिती सेवा समिती व सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी सुपा पोलिस स्टेशनला आंदोलनाचा इशारा दिला होता. 

त्यानुसार रविवार, दि. १२ रोजी सकाळी १० ते ११ या कालावधीत ग्रामस्थांच्या वतीने वडनेर येथील शहीद फाटयावर मौन व आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.