उपसरपंच पदाच्या निवडीसाठी रस्सीखेच.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मागील महिन्यात कोपरगाव तालुक्यात पार पडलेल्या २६ ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच थेट जनतेने निवडून दिले. आता सरपंच पदग्रहण आणि उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. तसा सदस्यांना मिटींग अजेंडाही बजावण्यात आल्यामुळे त्रिशंकू अवस्था तथा काठावर बहुमत असलेल्या ग्रामपंचायतीत आता उपसरपंच होण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली असून या पदासाठीही प्रतिष्ठा पणाला लावली जात आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
इतिहासात प्रथमच यावेळी सरपंच थेट जनतेच्या मर्जीने निवडले गेले. लोकशाहीत खऱ्या अर्थाने ती ग्रामविकासाची नांदी ठरली. अविश्वास ठराव आणि पदाचा धोका तत्त्वत: संभवत नाही. कारण अविश्वास ठरावही ग्रामसभेपुढे प्रथमदर्शी पारीत होणे गरजेचे आहे.

त्यात उपसरपंच हा प्रभागातून निवडून आलेला सदस्य जरी दावेदार असला तरी शासनाने निवडीसाठी काढलेल्या परिपत्रकानुसार दोन उपसरपंच उमेदवारांना समसमान मते पडली तरच सरपंचास निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
सरपंच नसेल तर चिठ्ठी काढून तो अधिकार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यास देण्यात आला आहे. त्यामुळे बहुमत असलेला उमेदवारच या पदावर विराजमान होणार असल्याने सध्या तालुक्यात या पदाची निवडणूक तेवढीच प्रतिष्ठेची समजून खर्चाचा विचार न करता प्रत्येकजण हाताच्या बोटावरच आकडेमोड करुन उपसरपंच होणार असल्याचे स्वप्न रंगवताना दिसत आहे. 

तरी अपक्ष निवडून आलेल्या उमेदवारांचा भाव चांगलाच वाढला असून त्यांनाही या पदाची लालसा लागून आहे. अटीतटीच्या वेळी गटाची आणि पक्षाची शान राखण्यासाठी हे पद अपक्षांच्या पदरात टाकण्याची नामुष्कीही ओढावण्याची वेळही राजकीय गटांवर ओढावण्याची शक्यता नाकारता येत नाही..

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.