श्रीगोंद्याला लवकरच कृषी महाविद्यालय : माजीमंत्री पाचपुते.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंद्यात लवकरच कृषी महाविद्यालय होणार असून, त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी दिली. तसेच श्रीगोंद्यात लवकरच शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे देखील पाचपुते यांनी सांगितले.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
माजी मंत्री पाचपुते यांनी आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात श्रीगोंद्याला कृषीमहाविद्यालय मंजूर करून घेतले होते. परंतु ना.राम शिंदे मंत्री झाल्यानंतर ते हळगावला हलवण्यात आले. त्यावर उच्चन्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने याबाबत राहुरी कृषीविद्यापीठाला फेरतपासणी अहवाल राज्य सरकारला सादर करण्याचे आदेश दिले आहेत. .

मुख्यमंत्री फडणवीस आज भीमापाटस कारखान्याच्या कार्यक्रमासाठी पाटस येथे आले असता, माजी मंत्री पाचपुते यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी श्रीगोंद्याला कृषिमहाविद्यालय सुरू करण्याबाबत चर्चा केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हळगावला कृषिमहाविद्यालय झाल्यास तुम्हाला काही अडचण आहे का असे विचारले.

यावर पाचपुते यांनी हळगावला कृषिमहाविद्यालय झाल्यास आम्हाला कोणतीही अडचण नाही. आमचा त्याला कधीच विरोध नव्हता. पण हळगावला एक आणि श्रीगोंद्याला एक असे दोन कृषिमहाविद्यालय व्हावेत असे पाचपुते यांनी सांगितले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
त्यावर मुख्यमंत्र्यांनी श्रीगोंदेकर व जामखेडकर असे दोघेही खुश होतील असा निर्णय लवकरच घेऊ असे आश्वासन पाचपुते यांना दिले आहे. त्यामुळे आता श्रीगोंद्याला कृषिमहाविद्यालय होणार असून, त्यामुळे श्रीगोंद्याच्या वैभवात भर पडणार असल्याची माहिती माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी दिली. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.