सील केलेल्या टपऱ्यांसमोर माव्याची विक्री सुरूच.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  गुप्तवार्ता विभाग, मुंबई व अन्न औषध व भेसळ प्रशासन यांच्या संयुक्त पथकाने गुरुवारी शहरातील मावा विक्री करणाऱ्या आठ टपऱ्यांवर छापे टाकून त्यांना सील ठोकले. तरीही त्याचा काहीही परिणाम मावा विक्रेत्यांवर झाल्याचे दिसून येत नाही. आजही सील केलेल्या टपऱ्यांसमोर टेबल मांडून त्यावर माव्याच्या पुडया ठेवून खुलेआम विक्री सुरू आहे. 

File Photo
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
या कारवाईत किरकोळ विक्रेते धरले. मात्र, ठोक विक्रेते बच्यावल्याने या ठोक विक्रेत्यांवर कधी कारवाई होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. एवढेच नव्हे तर या मावा विक्रेत्यांवर जरब बसेल, अशा पध्दतीने कारवाई होण्याची गरज आहे. शेवगाव शहरात मावा तयार करणारे मोठमोठे चार ते पाच कारखाने असून, १०० च्या आसपास किरकोळ विक्रीच्या टपऱ्या गल्लीबोळासह तालुकाभर पसरलेल्या आहेत. 

त्याचप्रमाणे शहसरासह पैठण, गेवराई, नेवासा या भागातही येथून ठोक पध्दतीने माव्याचा पुरवठा केला जातो. या व्यवसायात शहरात रोज लाखोंची उलाढाल होते. अनेक शालेय विद्यार्थी, तरुण, या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे त्याचे दुष्परिणाम म्हणून दुर्धर रोगांचा सामना करत आहेत. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

वृत्तपत्रांत बातम्या आल्यानंतर कारवाईचा देखावा केला जातो. प्रत्यक्षात मात्र या विक्रेत्यांवर जरब बसेल, अशी कारवाई होताना दिसत नाही. अन्न व औषध प्रसासन विभागाने त्यांच्यावर त्वरित कारवाई करून खटले दाखल केल्यास या व्यवसायाला आळा बसू शकतो. 

अन्न व औषध प्रशासन विभागाप्रमाणेच स्थानिक पोलीस प्रसासन विभागावर ही त्यांची जबाबदारी आहे. मात्र, या मावा विक्रेत्यांना पोलिसांकडून अभय मिळत असल्यानेच पोलीस ठाण्याच्या समोरच माव्याची विक्री सुरू आहे. सध्या शेवगाव पोलीस ठाण्याचा कार्यभार कर्तव्यदक्ष प्रक्षिशणार्थी पोलीस उपाधीक्षक पौर्णिमा तावरे यांच्याकडे आहे. त्यांच्याकडून जनतेला मोठया अपेक्षा आहेत. 

सुमारे तीन महिन्यांपूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मावा बनवणाऱ्या कारखान्यावर बोगस छापा टाकला होता. मात्र, आर्थिक तडजोड करून हे प्रकरण मिटवले गेले. त्याची चौकशी जिल्हा पोलीस प्रशासनामार्फत सुरू आहे. या प्रकरणानंतर अन्न व औषध प्रशासनाने एका कारखान्यावर छापा टाकून सुमारे दीड लाखाचा ऐवज जप्त केला. तेथील कामगारांनाही ताब्यात घेतले. मात्र, त्या कारावाईत जागा मालक व कारखानदार सहीसलामत कसे सुटले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

त्याठिकाणी पकडलेला मावा बनवण्याच्या घातक साहित्याची तपासणी झाली की नाही व संबंधितांवर काय कारवाई झाली, याचा खुलासा होण्याची गरज आहे. गुरुवारी झालेली कारवाईही संशयास्पद असून, या कारवाईत कोरकोळ विक्री करणारे दुकानदार पकडले गेले तर मोठी उलाढाल असणारे दुकानदार व कारखानदार सुटले आहेत. त्यांचे अन्न औषध प्रशासनाशी काही लागेबांधे आहेत काय, याचा खुलासा होणे गरजेचे आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.