शिवसेनेच्या नगरसेवकांकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर शिवसेनेचे नगरसेवक लखन सुधाकर घोरपडे व त्याचा मित्र प्रशांत प्रभाकर झावरे या दोघांनी गुरुवारी मध्यरात्री घुलेवाडी येथील ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मद्यप्राशन करून शिवीगाळ व धक्काबुकी केल्याने त्यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनाही शुक्रवारी पहाटे सुमारास अटक करण्यात आली.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
नगरसेवक घोरपडे व त्याचा मित्र झावरे हे दोघे गुरूवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या एकाला घेवून घुलेवाडी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी रुग्णालयात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना डॉक्‍टर कुठे आहेत ? अशी विचारणा केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी लगेचच डॉ. संदिप कचेरीया यांना याबाबत भमण्रध्वनीवरुन कल्पना दिली.

वैद्यकीय अधिकारी रुग्णालयात येण्या अगोदर काही काळ घोरपडे व झावरे यांनी तेथे उपस्थित असणाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुकी करत जीवे मारण्याची धमकी दिली. डॉ. कचेरीया हे तेथे तात्काळ उपस्थित झाले त्यानंतर त्यांनी जखमी रुग्णावर उपचार केले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

घोरपडे व त्याचा मित्र झावरे या दोघांनीही मद्यप्राशन केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. याप्रकरणी रुग्णालयातील कर्मचारी दादा लल्लु साबळे यांनी दिलेल्या फिर्यादवरून घोरपडे व झावरे यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.