वीज कनेक्‍शन तोडल्याने शेती पिके धोक्‍यात.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :वीज कंपनीच्या वतीने अकोले तालुक्‍यात शेतकऱ्यांकडील थकीत वीजबिलामुळे वीजजोड कपातीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. वीजबिले वसुलीसाठी आपले कर्मचारी आमच्या शेती पंपांचे वीज कनेक्‍शन तोडीत आहेत. आमची शेतातील उभी पिके त्यामुळे धोक्‍यात आली आहेत. अशा आशयाचे निवेदन राज्यातील शेतकरी वर्गाने वितरण कंपनीला द्यावे, असे आवाहन शेतकरी सुकाणू समितीचे समन्वयक डॉ. अजित नवले यांनी केले आहे.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
सरकारने आजवर आमच्या शेतीमालाचे भाव वेळोवेळी हस्तक्षेप करून पाडले. आधारभावाने शेतीमाल खरेदी करण्याचे बंधन सरकारवर असताना माल खरेदी करण्याची जबाबदारी टाळली. अत्यंत स्वस्त दरात आमचा शेतीमाल लुटला.त्यामुळे या शेतीमालाच्या प्रत्यक्ष विक्री व आधारभावातील फरकाची कोट्यवधींची आमची तफावत रक्‍कम आम्हाला सरकारकडून येणे आहे. वीज वितरण कंपनीने या तफावत रकमेतून आमची वीज बिले परस्पर वळवून घ्यावीत.

तसेच, सरकारने शेतकऱ्यांसाठी व शेतीसाठी केलेल्या आर्थिक तरतुदीतून वीज कंपनीला वारंवार अनुदाने दिली आहेत. दिलेल्या या अनुदानातून 16 तासाचे वीजबिलाचे पैसे सरकारने कंपनीला दिले आहे. उरलेल्या 8 तासाचे वीजबिल शेतकऱ्यांनी आजवर कंपनीला भरले आहे. अशा प्रकारे सरकार व शेतकरी मिळून 24 तासाचे बिल कंपनीला भरले असताना कंपनीने मात्र आजवर आठच तास वीज पुरवठा केला आहे. म्हणजेच 16 तासाचे शेतकऱ्यांच्या वाट्याचे अधिकचे पैसे कंपनीकडे आले आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

पर्यायाने आमच्याकडून नव्हे तर वीज कंपनीकडूनच आम्हा शेतकऱ्यांना कोट्यवधींची रक्‍कम येणे बाकी आहे. आम्हाला कंपनीकडून येणे असलेल्या या रकमेतून आमचे वीजबिल भरून घ्यावे व उरलेली रक्‍कम आम्हाला परत द्यावी, अशी आमची मागणी करणारे निवेदन दिले जावे, असे कळविले आहे.

तसेच, वीज नियामक आयोगाच्या नियमानुसार नोटीस दिल्याशिवाय व नोटिसीवर वीज ग्राहकांचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय कंपनीला वीज ग्राहकांचे वीज कनेक्‍शन कट करता येत नाही. कंपनीने नोटीस न देता व ग्राहकांना म्हणणे मांडण्याची संधी न देता कनेक्‍शन कट केल्यास कंपनीचे हे कृत्य नियमानुसार बेकायदेशीर ठरते. 

वीज कंपनीने सद्या सुरू केलेल्या मोहीमेत शेतकऱ्यांना नोटीस दिलेल्या नाहीत. म्हणणे मांडण्याची संधी दिलेली नाही. वीज नियामक मंडळाच्या नियमांनुसार म्हणूनच वीज कंपन्यांची ही मोहीम बेकायदा आहे. याकडे नवले यांनी शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

आम्ही सर्व शेतकरी आपणास या निवेदनांतर्गत सूचित करत आहोत की, कंपनीने शेतकऱ्यांना नोटीस दिलेली नाही. नोटिसीवर सक्षम न्यायापीठासमोर म्हणणे मांडण्याची संधी शेतकऱ्यांना दिलेली नाही. आधारभावातील व शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मिळालेल्या भावातील कोट्यवधी रुपयांचा फरक सरकारकडून शेतकऱ्यांना येणे आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

सरकारकडून आम्हास येणे असलेल्या या रकमेतून कंपनीने आमचे वीजबिल परस्पर वळवून घ्यावे. तसेच सरकारने कंपनीला आमच्या बिलापोटी जादा दिलेल्या अनुदानातून शेतकऱ्यांना यापुढे कोणतेही बिल न देता मोफत वीज पुरवावी, असा निवेदनात उल्लेख करावा, असे सुचवले आहे.

अन्यायकारक व बेकायदेशीररित्या आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आमच्या शेतीपंपाचे वीज कनेक्‍शन कट केल्यास याबाबत कायदा सुव्यस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास याची जबाबदारी आपल्या कंपनीवर राहील. याचा उल्लेख करून हे पत्र वीजविरण कंपनीबरोबरच मुख्यमंत्री, उर्जामंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना दिले जावे, असे त्यात नमूद केले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.