आ.शिवाजी कर्डिले यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा राज्यात सुरू असतानाच राहुरी नगर- पाथर्डी मतदारसंघाचे आमदार आणि नगर जिल्ह्याचे भाजपाचे ज्येष्ठनेते आ. शिवाजीराव कर्डिले यांना मुख्यमंत्र्यांनी तातडीने मुंबईला बोलावून घेतल्याने आ. कर्डिले यांचा होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात नंबर लागण्याची शक्यता कर्डिले समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
दोन दिवसांपूर्वीच आ. कर्डिले काही महत्वाचे कार्यक्रम रद्द करून अचानक मुंबईला रवाना झाले. या वेळी त्यांच्या सोबत युवानेते अक्षय कर्डिलेदेखील होते. आ. कर्डिले यांना मंत्रिमंडळामध्ये संधी दिली तर त्यांच्यावर जिल्ह्यातील निवडणुकांची मोठी जबाबदारी दिली ज़ाऊ शकते, असे काही एकनिष्ठ कार्यकत्याकडून बोलले जात आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चर्चा सुरू असून, काही जुन्या मंत्र्यांना डच्चू देऊन नव्यांना संधी देत नव्या जुण्यांची सांगड घातली जाणार असल्याची चर्चा आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
यापूर्वीदेखील काँग्रेस -राष्ट्रवादी सरकारच्या काळात राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी आ. कर्डिले यांना मिळाली होती. त्यामुळे त्यांना मंत्रीपदाचा अनुभव आहे. अधिवेशनापूर्वी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नगर जिल्ह्यातून आ. कर्डिले यांचे नाव चर्चेत असले तरी नेमकी कोणाला संधी मिळते, हे पहावे लागणार आहे. आ. कर्डिले मुंबईला रवाना होताच, त्यांच्या समर्थकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.