पालकमंत्री व साखर कारखानदारांना जिल्ह्यात फिरू देणार नाही.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगर जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने ऊसाला प्रतिटन ३४०० रुपये भाव जाहीर करीत नाहीत तोपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊसाला कोयता लावू देऊ नये, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आहे.तसेच दोन दिवसात याबाबत निर्णय न घेतला गेल्यास पालकमंत्री व साखर कारखानदारांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
काल शुक्रवार दि. १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता राहुरी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नगर-मनमाड राज्यमार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राहुरी तालुकाध्यक्ष रविंद्र बापूसाहेब मोरे यांनी केले..

अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांच्या गळीत हंगामास प्रारंभ झालेला आहे. मात्र कोणत्याही साखर कारखान्याने अद्याप ऊस दर जाहीर केलेला नसून या सर्व कारखान्यांनी त्वरित प्रतिटन ३४०० रूपये भाव जाहीर करावा. तसेच ऊसाचे वजन कमी येत असल्याची शेतकऱ्यांची भावना असल्याने कारखान्यांनी ऊसाचे वजन व त्यापोटी मिळणारे पेमेंट ऑनलाईन क रुन ऊसतोड झाल्यापासून १५ दिवसांत पेमेंटची सर्व रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यात जमा करावी.

यासह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी खा. राजू शेट्टी यांच्या आदेशावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन हाती घेतले असून आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात काल राहुरीत रास्तारोको आंदोलन करण्यात आले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

उसाला गुजरात मध्ये ४७०० रूपये, उत्तरप्रदेशमध्ये ३५०० रूपये प्रतिटन भाव दिला जातो. मग महाराष्ट्रात त्याप्रमाणे भाव का मिळत नाही? असा खडा सवाल रविंद्र मोरे यांनी यावेळी उपस्थित करून दोन दिवसात प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला. आंदोलनामुळे राज्यमार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागून बराच वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. आंदोलकांचे निवेदन नायब तहसीलदार यांनी स्वीकारले. पो.नि. प्रमोद वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

आंदोलनात प्रकाश देठे, दिनेश वराळे, देवेन्द्र लांबे, संदीप खुरूद, ज्ञानदेव क्षीरसागर, संतोष पवार, अरूण डौले यांची भाषणे झाली. आंदोलनात सुभाष वने, संग्राम धुमाळ, किशोर भिंगारकर, प्रविण पवार, सुनिल इंगळे, सतीश पवार, सचिन म्हसे, सचिन पवळे, प्रशांत पवार, प्रमोद पवार, सचिन पवार, देविदास करपे, संदीप खुरूद, संजय डौले, भगिरथ पवार आदी पदाधिकारी व ऊस उत्पादक सामील झाले होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.