किडीचा प्रादुर्भाव झाल्याने भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भंडारदरा पाणलोट क्षेत्रामध्ये भात शेतीच्या पिकावर पांढऱ्या पाकुळीसारख्या किडीचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संपुर्ण उभे पिकच ही किड नष्ट करत असल्याने शेतकऱ्यासमोर एक नविनच समस्या तयार झाली आहे. या किडीचा भविष्यात त्रास होऊ नये म्हणून कृषी खात्याने तात्काळ पावले उचलण्याची मागणी आदिवासी पट्टयातून होत आहे.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
भात पिकासाठी भरपुर पावसाची गरज असते. यावर्षी परतीच्या पावसाने राज्यात धुमाकुळ घालत प्रचंड प्रमाणात नुकसान केले होते. या परतीच्या पावसाने भंडारदऱ्याच्या अतिदुर्गम भागातही थैमान घातले होते. पंरतु भात पिक एकदा पोटरीत आले कि शेवट दोन ते तीन पावसाची गरज असते. त्यामुळे परतीचा पाऊस हा आदिवासी बांधवासाठी एक प्रकारे वरदानच ठरला होता.

पाऊस देवासारखा मदतीला धावून आला असतानाच भात सोंगणीच्या वेळेला रतनवाडी, घाटघर, उडदावणे, पांजरे या पट्टयात अनेक भातपिकांवर सफेद पाकुळीसारख्या किडीचा प्रादुर्भाव झाला असल्याचे दिसुन येत आहे. ही किड भात पिकाचा नेमका दाणाच पोखरीत असुन उभे पिक डौलदार दिसत असले तरी भात सोंगणीच्या वेळी उत्पन्नात घट झाल्याचे दिसत आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

काही शेतकऱ्यांचे संपुर्ण पिकच या किडीने खाऊन टाकले आहे. अनेक शेतकऱ्यांनी भात सोंगणी केली असुन या किडीने संपुर्ण भात पिकच पोखरल्याने त्यांच्या पदरी निराशा आली आहे. या पांढऱ्या पाकुळीच्या किडीने अनेक शेतकऱ्यांना फटका बसला असुन अकोले तालुका कृषी विभागाला यासंबंधात कळवले आहे. 

सदर तक्रार प्रगतशिल शेतकरी बाबुराव अस्वले व सुरेश गभाले यांनी केली आहे. या पद्धतीच्या किडीचा भंडारदरा परिसरात पहिल्यांदाच प्रादुर्भाव झाल्याचे अनेक शेतकऱ्यांकडुन ऐकावयास मिळत आहे. या पद्धतीच्या किडीचा प्रादुर्भाव जुन्नर परिसरातही झाला असल्याचे हासे सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.