के.के.रेंज साठी एक गुंठाही जमीन देणार नाही - माजी खासदार दादा पाटील शेळके.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :के.के.रेंज साठी शेकडो एकर जमिन आधीच अधिग्रहित करण्यात आल्या असून के.के.रेंज साठी सरकारी जमिनी हस्तांतरित करण्याबाबतचे वृत्त आहे. त्यामुळे बारागाव नांदूर व इतर सतरा गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. के.के. रेंजला दिली जाणारी शासकीय जमीन नेमकी कोणती याचा खुलासा व्हावा, अशा प्रकारची मागणी माजी खासदार दादापाटील शेळके यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्याकडे केली.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारच्या सुमारास वावरथ जांभळी, वरवंडी, बारागाव नांदूर व इतर सतरा गावांतील शेतकऱ्यांच्या मंडळाने श्री. महाजन यांची भेट घेतली . यावेळी माजी खासदार दादा पाटील शेळके, जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव गाड़े ,अण्णासाहेब रंगनाथ बाचकर , बापू रोकडे ,गंगाधर जाधव, गोरक्षनाथ कदम, विलास जाधव उपस्थित होते.

निवेदन स्वीकारण्यापूर्वी जिल्हाधिकारी महाजन यांनी शिष्टमंडळाशी प्रदीर्घ संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. ज्या सरकारी जमिनीचा विषय चर्चेत आहे ती जमीन पूर्वीपासूनच लष्कराच्या वापरात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. परिसरातील गावकऱ्यांच्या शिष्टमंडळाने व्यक्त केलेल्या भावना आपण शासनास कळवू अशी ग्वाही जिल्हाधिकारी महाजन यांनी दिली .
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

एक गुंठाही जमीन देणार नाही.
यावेळी माजी खासदार दादा पाटील शेळके म्हणाले , ब्रिटिशांच्या काळात जमिनी घेण्यात आल्या. त्यामुळे अनेक शेतकरी गाव सोडून परागंदा झाले. आज त्यांच्या वरसांवर मोलमजुरीची वेळ आली. प्रती एकर शंभर रुपये प्रमाणे अधिगृहित जमिनीचा मोबदला मिळाला. संरक्षणासाठी एकदा विस्थापित झालो. अधिसुचनेमुळे आता पुन्हा जमिनी घेतल्या जातील अशी भीती के.केरेंज.च्या सरहद्दीवरील नगर ,पारनेर , राहुरी तालुक्याच्या गावात आहे. आता खाजगी काय पण शासकीय जमिनीचा एक गुंठाही अधिग्रहित करू देणार नाही असे ठाम प्रतिपादन माजी खासदार दादा पाटील शेळके यांनी केले.

अफवावर विश्वास नको, माहिती घ्या.
जिल्हाधिकारी महाजन यांनी शिष्टमंडळातील प्रत्येकाचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेतले . जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले , शासकीय ,गायरान जमिनी कोणत्या याचा डाटा ऑनलाईन उपलब्ध आहे. अधिग्रहणाची कारवाई ही एका दिवसात होणारी नाही. यासंदर्भात संबंधितांनी माहिती घ्यावी. अर्धवट माहितीने अफवा पसरतात. अफवांवर विश्वास ठेवू नका. तुमच्या भावना शासनाला कळवतो, असे महाजन यांनी सांगितले.

साहेब ,तुमचाच आधार.
के.के. रेंज , मुळा धरण आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यासाठी यापूर्वीच तीनदा आमच्या जमिनी गेल्या .परिसरातील शेतकऱ्यांनी माळरानावर माती टाकून परिश्रमाने शेती फुलवली. आता पुन्हा जमीन अधिग्रहणाच्या चर्चेने २३ गावांच्या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जिल्हाधिकारी साहेब, आता तुम्हीच आमचे पालक आहात, आधार आहात ! अशी भावना शिष्टमंडळातील जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजी गाड़े यांनी व्यक्त केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.